Indian Idol 10 चा विजेता सलमान अलीचे खास धमाकेदार परफॉर्मन्स...खास आपल्यासाठी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 10:06 IST2018-12-24T10:04:42+5:302018-12-24T10:06:16+5:30

‘इंडियन आयडॉल 10’चा विजेता सलमान अलीचे काही धमाकेदार परफॉर्मन्स खास आपल्यासाठी... हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही ‘इंडियन आयडॉल 10’च्या या विजेत्याच्या प्रेमात पडाल हे नक्की...

indian idol 10 winner salman alis five performances | Indian Idol 10 चा विजेता सलमान अलीचे खास धमाकेदार परफॉर्मन्स...खास आपल्यासाठी!!

Indian Idol 10 चा विजेता सलमान अलीचे खास धमाकेदार परफॉर्मन्स...खास आपल्यासाठी!!

ठळक मुद्देइंडियन आयडॉल’ची शानदार ट्रॉफी आणि २५ लाखांचे रोख बक्षिस देऊन सलमानला गौरविण्यात आले.

इंडियन आयडॉल’ या लोकप्रिय सिंगीग रिअ‍ॅलिटी शोचे दहावे ग्रॅण्ड फिनाले काल रात्री खऱ्या अर्थाने ग्रॅण्ड ठरले. सुरुवातीपासूनच लोकांचे मन जिंकणारा सलमान अली या सीझनचा विजेता ठरला. ‘इंडियन आयडॉल’ची शानदार ट्रॉफी आणि २५ लाखांचे रोख बक्षिस देऊन सलमानला गौरविण्यात आले.
काल रंगलेल्या ‘इंडियन आयडॉल 10’च्या ग्रॅण्ड फिनालेमध्ये शाहरुख खान, कॅटरिना कैफ, अनुष्का शर्मा यांची उपस्थिती खास लक्षवेधी ठरली. सलमानच्या गायकीने शाहरुख इतका प्रभावित झाला की, त्याने सलमानला ‘माय नेम इज खान’ या चित्रपटातील ‘सजदा’ हे गाणे गाण्याची फर्माईश केली. शाहरुखची ही फर्माईश सलमानने पूर्ण केली आणि ग्रॅण्ड फिनालेची रात्र आणखीच ग्रॅण्ड झाली...
सलमानला ग्रॅण्ड फिनालेत जवळपास २ कोटी वोट्स मिळालेत. ‘इंडियन आयडॉल 10’चा विजेता म्हणून सलमानचे नाव जाहिर करण्यात आले आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला...

आज आम्ही सलमानचे काही धमाकेदार परफॉर्मन्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही ‘इंडियन आयडॉल 10’च्या या विजेत्याच्या प्रेमात पडाल हे नक्की...तेव्हा पाहा तर...

Web Title: indian idol 10 winner salman alis five performances