TRPच्या शर्यतीत 'आई कुठे काय करते'ची मालिकेची पिछेहाट, तर या मालिकेने मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 11:56 AM2022-01-29T11:56:59+5:302022-01-29T12:22:57+5:30

सध्या वेगवेगळ्या मराठी वाहिन्यांवर बऱ्याच मालिका सुरू आहेत. नंबर वन मालिका बनण्यासाठी मालिकांमध्ये चढाओढ सुरू असते.

In the TRP race, the marathi serial become number one | TRPच्या शर्यतीत 'आई कुठे काय करते'ची मालिकेची पिछेहाट, तर या मालिकेने मारली बाजी

TRPच्या शर्यतीत 'आई कुठे काय करते'ची मालिकेची पिछेहाट, तर या मालिकेने मारली बाजी

googlenewsNext

सध्या वेगवेगळ्या मराठी वाहिन्यांवर बऱ्याच मालिका सुरू आहेत. नंबर वन मालिका बनण्यासाठी मालिकांमध्ये चढाओढ सुरू असते. मालिकांच्या टीआरपीवरून ( TRP ratings) मालिकेची लोकप्रियता ठरते. साहजिकच टीआरपीच्या शर्यतीत सतत अव्वल राहण्यासाठी मालिकांमध्ये नवनवे ट्वीस्ट येत राहतात. काही अनपेक्षित वळणं प्रेक्षकांना आवडतात तर काहींना प्रेक्षक लगेच कंटाळतात.या आठवड्यातल्या TRP रेटिंग्जमध्ये काही वेगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. दर आठवड्याला प्रेक्षकांचा कल बदलंत जातोय. या आठवड्यातील टीआरपी यादीतील टॉप 10 मालिकांची. 

आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte), रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla), सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asata), माझी तुझी रेशीमगाठी (Mazi Tuzi Reshimgathi), यासारख्या मालिका या टीआरपी (TRP)च्या रेसमध्ये स्पर्धा करताना पाहायला मिळतायेत.

स्टार प्रवाह वाहिनीवरील रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla) मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. तर आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर स्टार प्रवाहवरील 'मुलगी झाली हो' ही मालिका आहे. तर चौथ्या क्रमांक  'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asata) या मालिकेने पटकावलाय. पाचव्या क्रमांकावर फुलाला सुंगध मातीचा मालिका आहे. सहाव्या क्रमांकावर झीवरील  माझी तुझी रेशीमगाठी (Mazi Tuzi Reshimgathi) मालिका आहे तर सातव्या क्रमांकावर स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी ही मालिका आहे.  स्वाभिमान, सहकुटुंब सहपरिवार, धुमधडाका  या अनुक्रमे आठव्या, नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर आहेत.   
 

Web Title: In the TRP race, the marathi serial become number one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.