'जाऊ बाई गावात' शोमध्ये मुलींची उडणार तारांबळ, ट्रॅक्टरचा टास्क होणार रंगतदार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 13:57 IST2023-12-19T13:54:23+5:302023-12-19T13:57:26+5:30
नुकताच 'जाऊ बाई गावात' (Jau Bai Gavat Show) हा नवीन शो दाखल झाला आहे. या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

'जाऊ बाई गावात' शोमध्ये मुलींची उडणार तारांबळ, ट्रॅक्टरचा टास्क होणार रंगतदार
झी मराठीवर नुकताच 'जाऊ बाई गावात' (Jau Bai Gavat Show) हा नवीन शो दाखल झाला आहे. या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या शोमध्ये ऐशो आरामात जगलेल्या मुली स्पर्धक म्हणून दाखल झाल्या आहेत, ज्या गावात जाऊन तिथली संस्कृती आणि नवीन गोष्टी शिकणार आहेत. यादरम्यान त्या वेगवेगळ्या टास्कचा सामनादेखील करणार आहेत. या शोचं सूत्रसंचालन अभिनेता हार्दिक जोशी (Hardik Joshi) करत आहे. हा शो दिवसेंदिवस रंगत चालला आहे. मजेशीर टास्क पाहताना आणि शहरी मुलींची तारांबळ उडालेली पाहताना सर्वाना नक्कीच मज्जा येत असेल.
तुमची उत्सुकता अशीच कायम ठेवण्यासाठी हार्दिक दादा एक नवीन टास्क आला आहे ‘ट्रॅक्टर शर्यत’, ज्या मध्ये गंमत ही आहे की ह्या टास्क मध्ये प्रत्येक टप्प्यावर अडथळे असणार आहेत जे स्पर्धकांना पार करायचे आहेत. जो हे सगळे अडथळे पार पाडणार तोच या टास्कचा विजेता बनणार. हे सर्व होत असताना स्पर्धकांमध्ये टशन होताना दिसत आहे. आता फक्त टास्क मध्ये नाही तर एलिमिनेशन टप्पावर ही जोरदार टशन दिसणार आहे. काय वाटतंय कोणाच्या प्रवासाला लागेल ब्रेक आणि कोण होईल ह्या टास्कचा विजेता कोण होईल हे आपल्याला लवकरच होईल.