'लाखात एक आमचा दादा' उत्कंठावर्धक वळणावर, तुळजा सूर्याला करणार प्रपोज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 17:22 IST2024-11-14T17:21:25+5:302024-11-14T17:22:39+5:30

Lakhat Ek Amacha Dada : 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. मालिकेत ज्याची सर्व प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. तो क्षण म्हणजे तुळजा आणि सूर्या मधल्या प्रेमाची सुरुवात. हा क्षण लवकरच मालिकेत पाहायला मिळणार आहे.

In an exciting twist to 'Lakhat Ek Amacha Dada', Tulja will propose to Surya | 'लाखात एक आमचा दादा' उत्कंठावर्धक वळणावर, तुळजा सूर्याला करणार प्रपोज

'लाखात एक आमचा दादा' उत्कंठावर्धक वळणावर, तुळजा सूर्याला करणार प्रपोज

'लाखात एक आमचा दादा' (Lakhat Ek Amacha Dada) मालिकेत अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. मालिकेत एक रोमांचक आणि इमोशनल क्षण येत आहे. ज्याची सर्व प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. तो क्षण म्हणजे तुळजा आणि सूर्या मधल्या प्रेमाची सुरुवात. तुळजा सूर्याला नदीच्या पात्रात प्रोपोज करणार आहे. या आधी फक्त सूर्याचं, तुळजासाठी प्रेम पहिले होते, पण आता तुळजाच्या या साहसी कृत्यामुळे प्रेक्षकांना एक अनोखा अनुभव मिळणार आहे.

प्रोमोत पाहायला मिळाले की, तुळजा प्रेमाची खरी कबुली देण्यासाठी नदीत उडी मारणार आहे. प्रोपोजलचा प्रोमो पाहून जशी तुमची उत्सुकता वाढली असेल अगदी तशीच तुळजा म्हणजेच दिशा परदेशीही उत्सुक आहे कारण तिने पहिल्यांदाच असा सीन शूट केलाय. आपली उत्सुकता व्यक्त करताना दिशा म्हणते ,  "तुळजाचा प्रपोजल सीन खूप युनिक आहे. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असं काही अनुभवतेय. आम्ही नदीत शूट केलंय आणि नदीला बऱ्यापैकी प्रवाह होता. मला पाण्यात उडी मारायची होती, पाणी खूप थंड होते आणि हा सीन सर्वांसाठी महत्वाचा होता. वेळ घेऊन आणि प्रत्येक गोष्टीची काळजी घेऊनच सीन शूट होत होता. मी हा अद्वितीय अनुभव कधीच विसरू नाही शकणार. मी साडी नेसली होती, मला साडी आणि मेकअप दोन्ही सांभाळायचा होता आणि एक्सप्रेशन देऊन डायलॉग्स ही बोलायचे होते सगळे एकत्र मॅनेज करून निभावणे मला प्रचंड वेगळा अनुभव देऊन गेला. 


ती पुढे म्हणाली की, शूट करत असताना नितीश आणि माझ्या पायाला मोठ- मोठे दगड टोचत होते पण आम्ही हा सीन पूर्ण केला. जवळपास ५-६ तास तो सीन सुरु होता आणि तितका वेळ आम्ही पाण्यात होतो. आम्हीच नाही तर पूर्ण टीमने ही तितकीच मेहनत केली आणि थोडं दुखणं, खुपणं झालं पण आम्ही खूप मज्जा ही केली. जेव्हा प्रोमो पहिला तेव्हा खूप भारी वाटलं कारण, तेव्हा माहित नव्हतं की प्रेक्षकांना कसं वाटेल, त्यांना आवडेल कि नाही. खूप विचार केला गेला होता कि तुळजा कशी, सूर्याला प्रोपोज करेल. खूप चर्चेनंतर हा सीन फायनल झाला. पण आता लोकांचा प्रतिसाद पाहून सर्वांच्या मेहनतीचं चीज झालंय असं वाटतंय. प्रेक्षकही उत्सुक होते की कधी तुळजा- सूर्याची प्रेम कहाणी सुरु होईल याची.

Web Title: In an exciting twist to 'Lakhat Ek Amacha Dada', Tulja will propose to Surya