अभिनयासोबत शाहिरला 'या' गोष्टीची देखील आहे आवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 07:15 IST2019-04-07T07:15:00+5:302019-04-07T07:15:00+5:30

शाहिर शेखने ‘स्टार प्लस’वरील ‘ये रिश्ते हैं प्यार के’ या मालिकेतून आपल्या अबीरच्या व्यक्तिरेखेने त्याच्या फॅन्सच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

I wrote my own shayaris for a few episodes: Shaheer Sheikh | अभिनयासोबत शाहिरला 'या' गोष्टीची देखील आहे आवड

अभिनयासोबत शाहिरला 'या' गोष्टीची देखील आहे आवड

ठळक मुद्देशाहिरने आपल्या भूमिकेसाठी स्वत:च कविता लिहिल्या होत्याशाहीर हा भारताप्रमाणेच अनेक इंडोनियामधील मालिकेत देखील काम करतो

शाहिर शेखने ‘स्टार प्लस’वरील ‘ये रिश्ते हैं प्यार के’ या मालिकेतून आपल्या अबीरच्या व्यक्तिरेखेने त्याच्या फॅन्सच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. शाहिरला अभिनयासोबत कविता करायची देखील आवड आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. मालिकेतील काही सुरुवातीच्या भागात शाहिरने आपल्या भूमिकेसाठी स्वत:च कविता लिहिल्या होत्या.  

याबाबत शाहिर सांगतो, “कविता हा अबीरच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा पैलू आहे आणि मालिकेत प्रवेश करताना प्रेक्षक त्याला नेहमी कविता करताना ऐकत होते. माझ्या व्यक्तिरेखेचा हा रंजक पैलू असून अबीरच्या व्यक्तिमत्त्वाचा तो महत्त्वाचा भाग आहे. ही व्यक्तिरेखा साकारताना कविता करायला मला खूप मजा येत होती आणि सुरुवातीच्या काही भागांतील कविता मीच केल्या होत्या. लेखन हा माझ्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग असून वयाच्या 15-16 व्या वर्षापासून मी लेखन करीत आहे. पण माझा बहुतांशी सारा वेळ अभिनय करण्यात आणि या व्यक्तिरेखेला साकार करण्यात जात असल्याने मला कविता करण्याकडे लक्ष देण्यासही वेळ मिळत नाही. प्रेक्षक आणि चाहत्यांना माझी भूमिका पसंत पडत असेल, अशी मी आशा करतो.” 

शाहीर हा भारताप्रमाणेच अनेक इंडोनियामधील मालिकेत देखील काम करतो. इंडोनेशिया मध्ये देखील त्याला चांगलीच लोकप्रियता आहे. त्याने अयू टींग टींग सोबत इंडोनेशियामधील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
 

Web Title: I wrote my own shayaris for a few episodes: Shaheer Sheikh