‘'कसौटी झिंदगी की’मध्ये मला पुन्हा अनुराग साकारायला आवडेल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 06:00 IST2018-08-07T09:34:36+5:302018-08-08T06:00:00+5:30

‘कसौटी जिंदगी की’ हा एकेकाळी गाजलेला शो पुन्हा एकदा परतणार आहे. या गोष्टीचा आनंद सीझान खान आनंदित झाला आहे.

I wish I could play Anurag again in Kasautii Zindagii ki | ‘'कसौटी झिंदगी की’मध्ये मला पुन्हा अनुराग साकारायला आवडेल"

‘'कसौटी झिंदगी की’मध्ये मला पुन्हा अनुराग साकारायला आवडेल"

ठळक मुद्दे ''मी तेव्हा चित्रीकरणात गुंतलेलो असल्याने मला तिचे बरेचसे भाग पाहता आले नव्हते''''मला आता ती मालिका पाहण्याची उत्सुकता लागली आहे''

‘कसौटी जिंदगी की’ हा एकेकाळी गाजलेला शो पुन्हा एकदा परतणार आहे. या गोष्टीचा आनंद सीझान खान आनंदित झाला आहे. या मालिकेत 2001 मध्ये अनुराग बसू ही मध्यवर्ती भूमिका त्याने साकारली होती. ‘कसौटी झिंदगी की’ या मालिकेने उदंड लोकप्रियता संपादित केली होती आणि ती पुन्हा कधी सुरू होते, याकडे लक्षावधी प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले होते.

यासंदर्भात सीझान म्हणाला, “आज मी जो काही आहे, तो केवळ ‘कसौटी झिंदगी की’ या मालिकेमुळेच आहे. या मालिकेनेच मला यश आणि लोकप्रियता दिली. आता या मालिकेचं पुनरुज्जीवन होणार असल्याच्या वृत्तामुळे मला खूपच आनंद झाला आहे. या बातमीमुळे माझं मन पुन्हा ताजंतवानं झालं असून ही फारच छान बातमी आहे. या मालिकेची संगीतमय झलक पाहताना मी गतस्मृतींमध्ये हरवून गेलो होतो. त्या ट्रेलरमुळे माझ्या मनात अनेक आठवणींनी गर्दी केली होती. त्या दरम्यान मी अनुरागचं जीवन पुन्हा एकदा जगलो आणि आता नव्या मालिकेत अनुराग कोण आणि कसा साकारणार आहे, त्याची मला प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. मी तेव्हा चित्रीकरणात गुंतलेलो असल्याने मला तिचे बरेचसे भाग पाहता आले नव्हते. म्हणूनच मला आता ती मालिका पाहण्याची उत्सुकता लागली आहे.”

अनुरागची लोकप्रिय व्यक्तिरेखा पुन्हा साकारण्याबद्दल त्याला विचारले असता तो म्हणाला, “नव्या ‘कसौटी झिंदगी की’ मालिकेत मला पुन्हा एकदा अनुराग बसूची भूमिका रंगविण्यास नक्कीच आवडेल; परंतु या नव्या मालिकेतील सर्वच कलाकार नवे आहेत, असं मी ऐकलं. ज्यांनी पूर्वीची मालिका पाहिली नसेल, त्यांना आता कलाकारांच्या नव्या संचातील ही मालिका पाहण्याची उत्तम संधी मिळाली आहे.”

Web Title: I wish I could play Anurag again in Kasautii Zindagii ki