मला कधी वाटले नव्हते मी नट होईल - राजेंद्र चावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 06:30 IST2018-08-20T13:45:17+5:302018-08-28T06:30:00+5:30
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील जिंदगी के क्रॉसरोड्स या कार्यक्रमात जीवनाच्या नाट्यातून जन्मलेल्या काही जीवनाशी संबंधित आणि जीवनाला नवीन वळण देणार्या कथा असतात.

मला कधी वाटले नव्हते मी नट होईल - राजेंद्र चावला
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील जिंदगी के क्रॉसरोड्स या कार्यक्रमात जीवनाच्या नाट्यातून जन्मलेल्या काही जीवनाशी संबंधित आणि जीवनाला नवीन वळण देणार्या कथा असतात. मत आणि अभिप्राय यांच्या भावनिक रोलर कोस्टर राइडच्या या जिंदगी के क्रॉसरोड्स नामक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आहे राम कपूर यांनी, निर्मात्या आहेत, शबिना खान व लेखन केले आहे, महादेव यांनी. या कार्यक्रमाच्या प्रत्येक भागात एक नवीन गोष्ट असते. आणि त्या गोष्टीतील नायकापुढे असलेला पेचप्रसंग स्टुडिओतील प्रेक्षकांसमक्ष चर्चेसाठी खुला ठेवला जातो. हा एक अत्यंत नवा असा फॉरमॅट आहे, जो वीकडेजला प्राइम-टाइमला प्रसारित होतो, या कार्यक्रमकडून खूप आशा नसतील तरच नवल!
अशीच एक वेधक गोष्ट आहे, ‘मुन्शीजी’ ज्यात राजेंद्र चावला हा अष्टपैलू नट प्रमुख भूमिकेत दिसेल. हे कथानक एका अशा प्रामाणिक माणसाभोवती फिरते, जो कुणाचे काहीही वाईट करत नाही आणि त्याचा स्वतःवर दृढ विश्वास आहे. ही एक भावस्पर्शी गोष्ट आहे आणि ती उपस्थित प्रेक्षकांना आपले मत मांडण्यास तर उद्युक्त करेलच पण त्या निर्णयामागील कारण देखील काढून घेण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून प्रस्तुत कथेसाठी प्रेक्षकांच्या अनेक शक्यता दर्शवणार्या मतांचा एक संच तयार
होईल.
राजेंद्र चावला यांनी सांगितले, ‘मला जेव्हा या भूमिकेसाठी प्रॉडक्शन हाऊसकडून बोलावणे आले, तेव्हा मी खूप आनंदलो होतो. या कार्यक्रमातील माझी व्यक्तिरेखा एका प्रामाणिक आणि सरळमार्गी माणसाची आहे. या भूमिकेची तयारी करताना मी माझ्या वडिलांना मनःचक्षुंसमोर ठेवले होते कारण ते माझा आदर्श आणि माझी प्रेरणा आहेत. माझ्या जीवनात आलेली द्विधा म्हणजे, चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योग यातून एकाची निवड करणे ही होती. आणि मजेची गोष्ट म्हणजे, मी एका व्यापारी कुटुंबात जन्माला आलो आहे आणि मी कधी नट होईन हे माझ्या ध्यानीमनीही नव्हते. मला वाचनाचाही कंटाळा होता. जेव्हा माझ्या कुटुंबियांनी स्थिरस्थावर होण्यासाठी माझ्यामागे तगादा लावला, त्यावेळी मी माझ्या वडिलांच्या मदतीने अभिनयाकडे वळलो.”