"आपलं मराठीपण फार आवडतं", स्वाती चिटणीस यांनी सांगितली मराठी-हिंदी इंडस्ट्रीतील 'सांस्कृतिक तफावत'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 19:02 IST2025-09-27T19:02:01+5:302025-09-27T19:02:20+5:30
Swati Chitnis : ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांनी एका मुलाखतीत मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीतील सांस्कृतिकदृष्ट्या वेगळेपणावर भाष्य केले.

"आपलं मराठीपण फार आवडतं", स्वाती चिटणीस यांनी सांगितली मराठी-हिंदी इंडस्ट्रीतील 'सांस्कृतिक तफावत'
ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस (Swati Chitnis) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी मराठीसह हिंदी सिनेमा आणि मालिकेतही काम केले आहे. नुकतेच त्यांनी एका मुलाखतीत मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीतील सांस्कृतिकदृष्ट्या वेगळेपणावर भाष्य केले. यावेळी त्यांनी आजच्या 'स्टारडम'मध्ये गुंतलेल्या तरुण पिढीची कार्यशैली आणि मराठी संस्कृतीतील आदर आणि आपुलकीची भाषा यातील फरक अगदी सहजपणे अधोरेखित केला आहे.
आरपार ऑनलाईनला दिलेल्या मुलाखतीत स्वाती चिटणीस यांना विचारण्यात आले की, 'स्टारडम' मिरवणाऱ्या तरुण कलाकारांना पाहून त्यांना जाऊन सांगावं असं वाटतं का की, 'मी ५० वर्षे थिएटर केलेली अभिनेत्री आहे.' त्यावर स्वाती चिटणीस म्हणाल्या की, ''मला खूप मज्जा येते. मी बघत बसते ते सगळे त्यांचे तमाशे जे काही चालतात. मला खूप मज्जा येते. मी त्यांच्यात कोणामध्येच पडत नाही. मी कुणालाही काही सांगायला जात नाही. शक्यतो. फक्त माझ्यामध्ये येऊ नको बाबा. माझं काम मला नीट करु दे. पण ते त्यांचे नखरे बघायला मला खूप आवडतं.''
''आपलं मराठीपण फार आवडतं.''
त्या पुढे म्हणाल्या की, ''साधी गोष्ट... आपल्याकडे अरे म्हणते आणि आपण आईला अगं तुगं करतो. हेही त्यांना पटत नाही. ते सगळे 'आप..' 'आप..' म्हणणारे आहेत. ते देवालाही 'आप' म्हणणारे आहेत. तर मी जेव्हा त्यांना म्हणाले की नाही... आमची माऊली आहे ती. तो आमचा गणपती आहे. तर त्यांना असं वाटतं तुम्ही असं कसं त्यांचा अपमान करताय देवाचा. तर सांस्कृतिकदृष्ट्या आपण खूप वेगळे आहोत. हे वेगळेपण आपलं मला फार आवडतं. मला आपलं मराठीपण फार आवडतं.''