“सना सय्यदच्या नीरा भॅनर्जीसह निर्माण झाले जिव्हाळ्याचे नाते

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 06:30 IST2019-04-29T06:30:00+5:302019-04-29T06:30:00+5:30

‘दिव्य दृष्टी’ या मालिकेत काही लोकप्रिय कलाकारांबरोबर, विशेषत: सना सय्यद या अभिनेत्रीबरोबर एकत्र भूमिका साकारण्याची संधी मिळाल्यामुळे नीरा बॅनर्जीला खूप आनंद झाला आहे.

"I found a Sister I have always wanted in Sana Sayyad" - Nyra Banerjee | “सना सय्यदच्या नीरा भॅनर्जीसह निर्माण झाले जिव्हाळ्याचे नाते

“सना सय्यदच्या नीरा भॅनर्जीसह निर्माण झाले जिव्हाळ्याचे नाते

जन्मत:च एकमेकांपासून दुरावलेल्या दोन बहिणींची कथा सादर करणार्‍्या  ‘दिव्य दृष्टी’ या मालिकेत या बहिणींनी आपली खरी ओळख आता उघड केली आहे. आता दिव्या (नीरा बॅनर्जी) आणि दृष्टी (सना सय्यद) या दोन्ही बहिणी एकाच घरात राहात असून त्या पिशाचिनीचा (मेघा चक्रबोर्ती) त्यांना असलेला धोका नाहिसा करण्याचा प्रयत्न करत आहेत.


या मालिकेत काही लोकप्रिय कलाकारांबरोबर, विशेषत: सना सय्यद या अभिनेत्रीबरोबर एकत्र भूमिका साकारण्याची संधी मिळाल्यामुळे नीरा बॅनर्जीला खूप आनंद झाला आहे. नीरा म्हणाली, “मला धाकटा भाऊ असून मला तो अतिशय आवडतो; पण मला एक धाकटी बहीण असावी अशी माझी लहानपणापासून इच्छा होती. आता दिव्य दृष्टीच्या सेटवर मला ही धाकटी बहीण मिळाल्याने माझा आनंद द्विगुणित झालआ आहे.


या मालिकेत सना आणि मी या बहिणी आहोत, पण खरं तर वास्तव जीवनातही आम्हा दोघींमध्ये हेच नातं आहे. आमच्यात हे नातं निर्माण झालं असून आम्ही नेहमीच एकमेकींच्या पाठीशी उभ्या असतो.” नीरा पुढे म्हणाली, “दिव्य दृष्टीसारख्या मालिकेत मला भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजते आणि मला माझी भूमिका फार आवडते. त्यात आता सना सय्यदसारखी बहीण लाभल्याने सोन्याहून पिवळं झालं आहे.”


पडद्यावर बहिणींच्या भूमिका साकारणार्‍्या अभिनेत्री वास्तव जीवनातही बहिणींसारख्यच वागतात, ऑनस्क्रीनही त्यांच्यातील या नात्याचे प्रतिबिंब प्रत्यक्ष भूमिकेत पडल्याचे दिसून येते.
 

Web Title: "I found a Sister I have always wanted in Sana Sayyad" - Nyra Banerjee