'मी Virat Kohli सारखा दिसत नाही,पण...'; कुशल बद्रिकेचा मजेशीर व्हिडीओ चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2022 16:19 IST2022-10-08T16:18:51+5:302022-10-08T16:19:31+5:30
Kushal Badrike: अभिनेता कुशल बद्रिकेने नुकतेच इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

'मी Virat Kohli सारखा दिसत नाही,पण...'; कुशल बद्रिकेचा मजेशीर व्हिडीओ चर्चेत
‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय शोमधील विनोदवीर कुशल बद्रिके (Kushal Badrike) याने आपल्या धमाल विनोदाने रसिकांच्या मनात घर केले आहे. कुशल सोशल मीडियावरही प्रचंड अॅक्टिव्ह असतो आणि सतत नवनवीन पोस्ट शेअर करून तो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतो. सध्या त्याची एक अशीच पोस्ट लक्ष वेधून घेते आहे. नुकताच त्याने चला हवा येऊ द्या शोमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात कुशल क्रिकेटर विराट कोहलीच्या गेटअपमध्ये दिसतो आहे. त्याचा हा व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे.
अभिनेता कुशल बद्रिकेने नुकतेच इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि लिहिले की, “मी” विराट कोहली सारखा दिसत नाही, खर आहे! पण म्हणून मला अशी अनुष्का द्याल ?. या व्हिडीओत तो क्रिकेटर विराट कोहलीच्या गेटअपमध्ये दिसतो आहे. मंचावर तो वॉर्मऑप करत एन्ट्री करतो आणि यावेळी त्याच्यासोबत अनुष्काच्या गेटअपमध्ये अभिनेता रोहित चव्हाण दिसतो आहे. त्याच्या या धमाल व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे.
कुशल बद्रिकेच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. नेहमीच तो आपल्या सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे चर्चेत असतो. कधी तो आपली पत्नी सुनयनाबरोबरचे व्हिडीओ शेअर करतो तर कधी मित्र विजू माने यांच्यासोबतचे धम्माल व्हिडीओ अपलोड करतो. त्याच्या पोस्टची चाहते वाट बघत असतात.