"तेव्हा गुड टच, बॅड टच माहित नव्हतं", कॉलेजच्या दिवसात भारती सिंगला आलेला वाईट अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 11:31 IST2025-08-20T11:31:15+5:302025-08-20T11:31:42+5:30

Bharti Singh: टेलिव्हिजनची कॉमेडी क्वीन भारती सिंग नेहमीच चर्चेत असते. तिने अलीकडेच खुलासा केला की कॉलेजमध्ये कोणीतरी तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता.

"I didn't know about good touch and bad touch then", Bharti Singh's bad experience during her college days | "तेव्हा गुड टच, बॅड टच माहित नव्हतं", कॉलेजच्या दिवसात भारती सिंगला आलेला वाईट अनुभव

"तेव्हा गुड टच, बॅड टच माहित नव्हतं", कॉलेजच्या दिवसात भारती सिंगला आलेला वाईट अनुभव

कॉमेडी क्वीन भारती सिंग (Bharti Singh) नेहमीच तिच्या विनोदी शैलीमुळे चर्चेत असते. अलीकडेच तिने एका मुलाखतीत कॉलेजमध्ये असताना तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला गेल्याचा धक्कादायक अनुभव सांगितला. त्या वेळी तिला 'गुड टच, बॅड टच' यातील फरक कळत नव्हता, असे तिने म्हटले आहे.

राज शमानीला दिलेल्या मुलाखतीत भारती सिंगने हा धक्कादायक प्रसंग सांगितला. भारती सिंग म्हणाली की,"जेव्हा माझ्याकडे अजिबात पैसे नव्हते, तेव्हा मी कॉलेजमध्ये कॉमेडी स्किट करायला जायची. त्या वेळी मला काहीच कळत नव्हते. आजकाल मुलांना 'चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श' (गुड टच, बॅड टच) शिकवतात, पण मला तेव्हा काहीच माहित नव्हते."

बसमध्ये झाली होती छेडछाड
भारतीने पुढे सांगितले, "मी कॉलेजमधून तीन दिवस सुट्टी घ्यायची आणि माझे मित्र एका छोट्या कॉलेजमध्ये जायचे. मी सकाळी ५ वाजताची बस पकडायची. त्या बसमध्ये सगळे दूधवाले असायचे. त्यात जागा नसायची. दीड वर्ष मला कळलंच नाही की कोणीतरी माझी छेड काढत आहे. जेव्हा कोणीतरी मला घट्ट पकडले, तेव्हा मला थोडंफार समजले, पण तरीही मी विचार करत राहिले की तो पडत असेल आणि त्याचा हात त्याच ठिकाणी लागला असेल."

"तेव्हा माझ्यातील 'भारती' जागी झाली आणि..."
भारतीने पुढे सांगितले की, "जशी मी मोठी झाली तेव्हा मला 'गुड टच आणि बेड टच' समजला. आम्हाला कधीच कोणी सांगितले नाही. आई आणि बहिणीही याबद्दल बोलण्यास लाजत होत्या. जेव्हा मला हे समजले, तेव्हा माझ्यातील 'भारती' जागी झाली आणि मी अनेक लोकांना कोपरा मारला. माझ्यापेक्षा मोठ्या मुलांनाही मी मारले, भलेही नंतर माझे हात थरथरले."
भारती सिंग एक आलिशान जीवन जगत आहे. तिने लेखक हर्ष लिंबाचियासोबत लग्न केले आहे आणि त्यांना 'गोला' नावाचा एक मुलगा आहे.

Web Title: "I didn't know about good touch and bad touch then", Bharti Singh's bad experience during her college days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.