Video : मीच आहे आलियाची ब्रेस्ट फ्रेन्ड..., मराठमोळी अभिनेत्री Rasika Sunil असं का म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 11:04 IST2022-04-06T11:04:13+5:302022-04-06T11:04:59+5:30

Rasika Sunil : होय, आलियाची बेस्ट फ्रेन्ड कोण? असा प्रश्न रसिकाला केला गेला. यावर कोण काय? मीच..., असं रसिका म्हणाली. इतकंच नाही. तिने ही मैत्री कशी झाली, हेही सांगितलं.

I am Alia Bhatt's breast friend marathi actress Rasika Sunil claim | Video : मीच आहे आलियाची ब्रेस्ट फ्रेन्ड..., मराठमोळी अभिनेत्री Rasika Sunil असं का म्हणाली?

Video : मीच आहे आलियाची ब्रेस्ट फ्रेन्ड..., मराठमोळी अभिनेत्री Rasika Sunil असं का म्हणाली?

बॉलिवूड स्टार आलिया भट (Alia Bhatt )सध्या जाम चर्चेत आहे. कारणही तसंच खास आहे राव. आलिया लवकरच तिचा बॉयफ्रेन्ड रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor)   लग्नगाठ बांधणार आहे. आलिया रणबीरच्या प्रेमात आहे, हे तुम्हाला ठाऊक आहेच. पण आलियाची बेस्ट फ्रेन्ड कोण? हे तुम्हाला ठाऊक आहे का? तर आता त्याचाही खुलासा झालाये. होय, एका मराठी अभिनेत्रीनं मीच आलियाची बेस्ट फ्रेन्ड असल्याचा दावा केला आहे. ही अभिनेत्री कोण तर रसिका सुनील (Rasika Sunil). 

होय, आलियाची बेस्ट फ्रेन्ड कोण? असा प्रश्न तिला केला गेला. यावर कोण काय? मीच..., असं रसिका म्हणाली. इतकंच नाही. तिने ही मैत्री कशी झाली, हेही सांगितलं. रणबीर माझा मित्र होता आणि रणबीरमुळे तिला माझ्याशी मैत्री करावी लागली, असंही तिनं सांगितलं. ऐकून आश्चर्य वाटलं ना?

रसिका म्हणतेय ते खरं आहे का? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर त्यासाठी तुम्ही बातमीसोबत दिलेला व्हिडीओ पाहिला पाहिजे. हा व्हिडीओ एका पुरस्कार सोहळ्यातील आहे.  रसिका  रेडिओ मिर्ची प्रस्तुत एका प्रश्न- उत्तरच्या कार्यक्रमातं सहभागी झाली. यावेळी तिला काही प्रश्न विचारण्यात आले.  आलियाची बेस्ट फ्रेंड कोण? असा प्रश्न तिला यावेळी केला गेला. यावर   मी... दुसरी कोण? असं ती म्हणाली. याला कारण देखील रणबीर आहे. त्याच्यामुळेच तिला माझ्याशी मैत्री करावी लागली, असंही तिनं सांगितलं.
 भारताचे पंतप्रधान कोण? असा प्रश्न देखील तिला विचारण्यात आला यावर तिने सारंग साठे असं उत्तर दिलं. तिचं हे उत्तर ऐकून तुम्ही रसिकाला ‘माठ’ म्हणाल. पण तिने मुद्दाम चुकीचं उत्तर दिलंय. होय, मुळात प्रश्नाचं चुकीचं उत्तर द्यायचं, हाच तिचा टास्क होता. एकंदर काय तर हा सगळा विनोदाचा भाग होता. रसिकाचा हा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
 अभिनेत्री रसिकाने नुकतीच बॉयफ्रेंड आदित्य बिलागीशी लग्न गाठ बांधली आहे.

Web Title: I am Alia Bhatt's breast friend marathi actress Rasika Sunil claim