हृता दुर्गुळेची पती प्रतीक शाहच्या वाढदिवसानिमित्ताने स्पेशल पोस्ट, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 13:10 IST2022-12-27T13:10:26+5:302022-12-27T13:10:48+5:30

Hruta Durgule : हृता सध्या तिचा नवरा प्रतीक शाहसोबत दुबईत व्हॅकेशन एन्जॉय करते आहे आणि व्हॅकेशन्सचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते आहे.

Hruta Durgule's special post on the occasion of her husband Prateek Shah's birthday, said... | हृता दुर्गुळेची पती प्रतीक शाहच्या वाढदिवसानिमित्ताने स्पेशल पोस्ट, म्हणाली...

हृता दुर्गुळेची पती प्रतीक शाहच्या वाढदिवसानिमित्ताने स्पेशल पोस्ट, म्हणाली...

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule)ने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे. मन उडू उडू झालं (Man Udu Udu Jhala) या मालिकेतील दीपूच्या भूमिकेतून तिला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले. हृता मालिकेशिवाय बऱ्याचदा खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते. हृता सध्या तिचा नवरा प्रतीक शाहसोबत दुबईत व्हॅकेशन एन्जॉय करते आहे आणि व्हॅकेशन्सचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते आहे. दरम्यान आज प्रतीक शाहचा वाढदिवस असून त्या निमित्ताने तिने सोशल मीडियावर स्पेशल पोस्ट शेअर केली आहे.

हृता दुर्गुळे हिने इंस्टाग्रामवर प्रतीक शाहसोबतचा फोटो शेअर करून लिहिले की, वाढदिवसाच्या शुभेच्छा पी. मला तुझ्याबद्दल काय वाटते ते योग्य शब्दात लिहिणे फार कठीण आहे! मला माहित आहे की मी त्यांना कधीही शोधणार नाही. तू जसा आहेस तसे राहा ! तुझ्यामुळे मी आयुष्याकडे चांगल्या दृष्टीकोनातून पाहते. माझ्या आशेचा किरण! माझा सनशाईन! हे आहे आयुष्यभराच्या प्रवासाच्या मोहिमा, घरे बांधणे, जीवन निर्माण करणे, एकत्र आठवणी जगूयात! Your cheerleader for life,H. 


अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अभिनेता प्रतीक शाह यांनी १८ मे रोजी लग्नगाठ बांधली. यंदाचं वर्ष हृतासाठी खूप खास ठरलंय. हृताची मन उडू उडू झालं मालिका यावर्षीची टॉप मालिका ठरली. तसंच छोट्या पडद्यावरून हृता मोठ्या पडद्याकडे वळली. तिचे बॅक टू बॅक दोन सिनेमे रिलीज झाले. अनन्या आणि टाईमपास ३ या सिनेमांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आले. तिच्या टाईमपास ३ मधील भूमिकेसाठी तिला तिचं पहिलं फिल्म अवॉर्ड देखील मिळालं. तसंच यावर्षी तिने तिचा तिसरा सिनेमा कन्नी देखील अनाऊंस केला आणि त्याच्या 
शूटिंगला सुरवात केली. तिचं दादा एक गुड न्यूज आहे नाटकं सुरपहिट ठरलं. याशिवाय आता हृता तिच्या पहिल्या वेबसीरीजच शूटिंगही करतेय.

Web Title: Hruta Durgule's special post on the occasion of her husband Prateek Shah's birthday, said...