मन उडु उडु झालं! हृता दुर्गुळेने दिली प्रेमाची कबुली; कोण आहे ही खास व्यक्ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 19:28 IST2021-11-18T19:27:59+5:302021-11-18T19:28:30+5:30

हृता दुर्गुळेच्या आयुष्यात एका खास व्यक्तीची एन्ट्री झाली आहे.

Hruta Durgule confesses her love; Who is this special person? | मन उडु उडु झालं! हृता दुर्गुळेने दिली प्रेमाची कबुली; कोण आहे ही खास व्यक्ती?

मन उडु उडु झालं! हृता दुर्गुळेने दिली प्रेमाची कबुली; कोण आहे ही खास व्यक्ती?

छोट्या पडद्यावरील मालिका 'मन उडु उडु झालं'मधील दिपू म्हणजेच अभिनेत्री हृता दुर्गुळेने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. तिचा चाहता वर्गही खूप मोठा आहे. सोशल मीडियावर हृता सक्रीय असून तिचा खूप मोठा फॅन फॉलोव्हिंग आहे. हृता बऱ्याचदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असते. नुकतीच अभिनेत्रीने शेअर केलेली पोस्ट सध्या खूप चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये तिने प्रेमाची कबुली दिली आहे. 

हृता दुर्गुळे बऱ्याचदा सोशल मीडियावरील पोस्ट आणि फोटोंमुळे चर्चेत येत असते. मात्र यावेळी ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तिच्या आयुष्यात एका खास व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. हृता दुर्गुळेने प्रेमात पडल्याची कबुली सोशल मीडियावर दिली आहे. चित्रपट दिग्दर्शक प्रतिक शाहसोबतचा फोटो शेअर करत तिने चाहत्यांसोबत ही गोष्ट शेअर केली आहे. तिने हा फोटो शेअर करत लिहिले की, मला तुझ्यामध्ये अशी आशा सापडली आहे. जी मला कधीच माहित नव्हती. तिच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने दुर्वा या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्यानंतर तिने फुलपाखरू मालिकेत काम केले. या मालिकेतून ती घराघरात पोहचली. सध्या ती मन उडु उडु झालं या मालिकेत काम करते आहे. हृताने नाटकातदेखील काम केले आहे. लवकरच ती अनन्या या चित्रपटातही झळकणार आहे. 

Web Title: Hruta Durgule confesses her love; Who is this special person?