ह्रता दुर्गुळेने प्रतिक शाहसोबत बांधली लग्नगाठ, अभिनेत्रीच्या लग्नातील पहिला फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 21:59 IST2022-05-18T21:14:57+5:302022-05-18T21:59:22+5:30

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि प्रतिक शाह (Pratik Shah) यांनी लग्नगाठ बांधली आहे.

Hruta Durgale tied knots with Prateek Shah | ह्रता दुर्गुळेने प्रतिक शाहसोबत बांधली लग्नगाठ, अभिनेत्रीच्या लग्नातील पहिला फोटो आला समोर

ह्रता दुर्गुळेने प्रतिक शाहसोबत बांधली लग्नगाठ, अभिनेत्रीच्या लग्नातील पहिला फोटो आला समोर

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि  प्रतिक शाह (Pratik Shah) यांनी लग्नगाठ बांधली आहे. वेधूच्या गेटअपमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. दोघांच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे.  हृता आणि प्रतिकची जोडी खूपच सुंदर दिसते आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ह्रता आणि प्रतिकच्या लग्नाची चर्चा होती.  सध्या ह्रता आणि प्रतिक शहावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. 

25 डिसेंबरला हृता आणि प्रतिक शाहचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर दोघे लग्न कधी करणार याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागली होती. अद्याप ह्रता आणि प्रतिकने त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून लग्नाचे फोटो शेअर केलं नाहीत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये हिंदी मालिकेतील बरेच कलाकार दिसतायेत. 

लोकमतच्या कार्यक्रमात दिली होती  प्रेमाची जाहीर कबुली
पहिल्यांदा ह्रता प्रतिक शहासोबत लोकमतच्या कार्यक्रमात आली होती. यावेळी ह्रताला मोस्ट रायझिंग स्टार हा पुरस्कार मिळाला होता. यावेळी तिने प्रतिकवर असलेल्या प्रेमाची कबुली दिली होती.


 
हृता दुर्गुळे हिने छोट्या पडद्यावर दुर्वा या मालिकेतून पदार्पण केले. त्यानंतर तिला खरी लोकप्रियता मिळाली ती फुलपाखरू या मालिकेतून. ऋताचे दादा एक गुड न्यूज आहे हे नाटक लोकप्रिय झाले आहे. सध्या ती मन ऊडू ऊडू झाले या मालिकेत काम करते आहे. तर प्रतिक शाह हा टेलिव्हिजनवरील आघाडीचा दिग्दर्शक आहे. त्याने आतापर्यंत बेहद २, कुठ रंग प्या के ऐसे भी, तेरी मेरी एक जिंदडी, बहू बेगम या मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. प्रतिकची आई मुग्धा शाह यादेखील लोकप्रिय अभिनेत्री आहेत.

Web Title: Hruta Durgale tied knots with Prateek Shah