'हृदयी प्रीत जागते' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, अखेर उर्मीचं सत्य येणार का प्रभाससमोर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 17:52 IST2022-11-22T17:41:33+5:302022-11-22T17:52:51+5:30

'हृदयी प्रीत जागते’ ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे.

Hrudayi Preet Jagate marathi serial episodic | 'हृदयी प्रीत जागते' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, अखेर उर्मीचं सत्य येणार का प्रभाससमोर?

'हृदयी प्रीत जागते' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, अखेर उर्मीचं सत्य येणार का प्रभाससमोर?

झी मराठी वाहिनीवर 'हृदयी प्रीत जागते’ ही मालिका काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. एक रिदमचा बादशाहा आणि एक सुरांची राणी अशी दोघांची जुगलबंदी मालिकेत पाहायला मिळतेय. आता मालिकेत उत्कंठावर्धक वळणावर येणार आहे. 

उर्मी घरी खोटे बोलून वीणासोबत प्रभासला भेटायला जात, मिहिर प्रभासला एंगेजमेंटच्या वेळेबद्दल खोटे सांगून त्याला स्टुडिओत पाठवतो. एकीकडे प्रभास खोटी वीणा बनून जाणाऱ्या उर्मीची  वाट पाहत आहे, तर दुसरीकडे  शैलजा सरपोतदार कुटुंबासमोर एंगेजमेंटसाठी प्रभास घरी येण्याची वाट पाहत आहे. उर्मी शेवटी स्टुडिओत पोहोचते. ती प्रभासला गाण्यास सांगते तिला गाण्यास सांगते. प्रभासचे गाणे ऐकून वीणा बाहेर मंत्रमुग्ध झाली आहे. 

वीणा वडिलांसोबत फोनवर बोलत असताना ती शैलजाच्या गाडीसमोर येते. प्रभासला घरी न्यायला आलेली आणि सरपोतदारांच्या अपमानाने संतापलेली शैलजा वीणाच्या कानाखाली मारून निघून जाते. शैलजा शांतपणे प्रभासचा हात धरून घरी घेऊन त्याला घरी घेऊन जाते. शैलजा घरी आल्यावर स्वतःला शिक्षा करून घेते, प्रभास तिला थांबवतो आणि माफी मागतो. शैलजा ठरवते की प्रभास डोक्यातून संगीत आणि कॉन्सर्ट हा विषय कायमचा काढायचा. हे सर्व घडामोडी घडत असताना, प्रभासला कळेल का  सुंदर आवाजामागील वीणाचा खरा चेहरा खोटी उर्मी नसून वीणा आहे?  हे पाहणे मनोरंजक असणार आहे.


 

Web Title: Hrudayi Preet Jagate marathi serial episodic