'ये रिश्ता क्या कहलाता है'मालिकेतून बाहेर पडल्यानंतरही हिना खानची क्रेझ कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2017 16:21 IST2017-01-16T16:21:10+5:302017-01-16T16:21:10+5:30

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेने बघता बघता 8 वर्ष पूर्ण केले आहेत. याच गोष्टींचे दणक्यात सेलिब्रेशनही करण्यात ...

'How is this relationship called?' Even after the release of Hina Khan's exit | 'ये रिश्ता क्या कहलाता है'मालिकेतून बाहेर पडल्यानंतरही हिना खानची क्रेझ कायम

'ये रिश्ता क्या कहलाता है'मालिकेतून बाहेर पडल्यानंतरही हिना खानची क्रेझ कायम

'
;ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेने बघता बघता 8 वर्ष पूर्ण केले आहेत. याच गोष्टींचे दणक्यात सेलिब्रेशनही करण्यात आले. विशेष म्हणजे हिना खान साकारत असलेल्या अक्षरा या भूमिकेला रसिक अजूनही विसरलेले नाहीत. मालिकेत दरवेळी अक्षराची एंट्री व्हावी अशीच चाहत्यांची अपेक्षा आहे. 8 वर्ष पूर्ण केल्यानंतर अखेर हिना खानने ही मालिका सोडली. मालिका सोडल्यानंतरही हिना खानला तिच्या चाहत्यांकडून सरप्राईज गिफ्ट देण्यात मिळाले. आहे. यांत गेम ऑफ थ्रोन या थिमवर बनवण्यात आलेला केक हिनाला एका चाहत्याकडून  भेट म्हणून मिळाला आहे. 2009 पासून सुरू झालेल्या या मालिकेची पहिल्या भागापासून हिना खानने रसिकांचे मनोरंजन केले आहे. त्यामुळे चाहत्यांचे प्रेम हे तिने मालिका सोडल्यानंतरही कमी होत नाहीय. म्हणूनच चाहत्यांच्या प्रेमापोटी तिला अनेक भेटवस्तू मिळाल्यात. खुद्द हिना खाननेच चाहत्यांचे भरभरून मिळालेले प्रेमाबद्दल आभार व्यक्त करत फोटोही शेअर केले आहेत. 



हिना खान, रोहन मेहरा आणि करण मेहरा यांनी या मालिकेला सोडचिठ्ठी दिली त्यात करण मेहरा आणि रोहन मेहरा बिग बॉसच्या घरात झळकले.मात्र हिना कोणत्या मालिकेत एंट्री करणार यांवर मात्र हिना खानने कमालिची गुप्तता पाळली आहे.  हिना खान साकारत असलेल्या अक्षरा या भूमिकेला रसिकांची भरघोस पसंती मिळाली होती. अक्षरा आणि नैतिक यांची रोमँटीक केमिस्ट्रीने रसिकांवर जादू केल्याचे पाहायला मिळाले. तीच क्रेझ आजही कायम असल्याचे दिसतेय. त्यामुळेच की काय रसिकांच्या मनात अक्षरा आजही घर करून आहे.

Web Title: 'How is this relationship called?' Even after the release of Hina Khan's exit