VIDEO: हॉटनेस अलर्ट! मराठी मालिकाविश्वातील अभिनेत्रीचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 19:48 IST2025-07-21T19:47:15+5:302025-07-21T19:48:47+5:30

अभिनेत्रीचे फोटोशूट आणि व्हिडीओ पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.

Hotness alert! The boldest video of an actress Gitanjali Ganage in the Marathi serial world so far | VIDEO: हॉटनेस अलर्ट! मराठी मालिकाविश्वातील अभिनेत्रीचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड व्हिडीओ

VIDEO: हॉटनेस अलर्ट! मराठी मालिकाविश्वातील अभिनेत्रीचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड व्हिडीओ

'अग्गंबाई सूनबाई' मालिकेतून घराघरात सुझॅनच्या भूमिकेतून अभिनेत्री गितांजली गणगे घराघरात पोहचली. गितांजली त्यानंतर आणखी काही मालिकेत झळकली. ती सोशल मीडियावर सक्रीय असून तिचे फोटो आणि व्हिडीओ चर्चेत येत असतात. नुकतेच तिने बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे, जो चर्चेत आला आहे. 

गितांजली गणगे फारशी सिनेइंडस्ट्रीत सक्रीय नसली तरी सोशल मीडियावर एक्टिव्ह आहे. ती अनेकदा बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर हॉट फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यात तिने फक्त ब्लेझर घातला आहे. त्यात तिने अंतर्वस्त्र घातलेलं नाही. यात तिने क्लीवेज दाखवताना दिसते आहे. तसेच तिने ब्लेझरवर पॅण्ट देखील घातलेली नाही. तिने फोटो शेअर करत लिहिले की, माझ्यावर नजर आहे. आउटफिट फक्त एक निमित्त आहे.


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
गितांजलीच्या फोटो आणि व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. अनेक युजर्सनी फायरची इमोजी शेअर केली आहे. बऱ्याच लोकांनी हॉट अशी कमेंट केलीय. तसेच सेक्सी आणि ब्युटिफुलदेखील म्हटलं आहे.  


वर्कफ्रंट
गितांजली मालिकाविश्वातील अभिनेत्री आहे. तिने नाटकांमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 'अगं, ऐकलंस का!' हे तिचे पहिलं व्यावसायिक नाटक होतं. या शिवाय ती ‘चिडीयाघर’ या सब टीव्ही वरील हिंदी मालिकेतही झळकली आहे.
 

Web Title: Hotness alert! The boldest video of an actress Gitanjali Ganage in the Marathi serial world so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.