पडद्यावर 'काकी' बनली, खऱ्या आयुष्यात त्याच्याशीच लग्नगाठ बांधली! कोण आहे 'ही' अभिनेत्री?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 11:54 IST2025-08-05T11:48:37+5:302025-08-05T11:54:08+5:30
पडद्यावर साकारली 'काकी'ची भूमिका त्याच्यावर जडला जीव! ८ वर्ष लहान हिंदू अभिनेत्यासोबत केलं लग्न, नायिकेची लव्ह लाईफ चर्चेत

पडद्यावर 'काकी' बनली, खऱ्या आयुष्यात त्याच्याशीच लग्नगाठ बांधली! कोण आहे 'ही' अभिनेत्री?
Television Actress: पडद्यावर एकमेकांसोबत काम करता करता काही कलाकार आयुष्यातही खऱ्या एकमेकांच्या प्रेमात पडले. अशी अनेक उदाहरणे समोर आहेत. यापैकी अनेकांनी संसार थाटला तर काहींचे प्रेम बोहल्यावर चढण्याआधीच संपले. अशीच एक अभिनेत्री जिने पडद्यावर मुलाच्या मित्राची भूमिका साकारणाऱ्या सहकलाकारासोबत लग्नगाठ बांधली. ही अभिनेत्री म्हणजे किश्वर मर्चंट आहे.
किश्वर मर्चंट आणि सुयश राय हे टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल आहे. सध्या ते दोघेही त्यांच्या वैवाहिक आयुष्यात समाधानी आहेत. त्यांना एक गोंडस मुलगा देखील आहे. परंतु, फार कमी लोकांना माहितीये की, पडद्यावर या अभिनेत्रीने ईश्वरच्या काकीची म्हणजेच त्याच्या मित्राच्या आईची भूमिका साकारली आहे. प्यार की ये कहानी मालिका साल २०१०-११ मध्ये प्रसारित व्हायची. या मालिकेत किश्वर मर्चंटच्या मुलाच्या भूमिकेत विवयन डिसना पाहायला मिळाला. तर सुयश रायने विवियनच्या मित्राची भूमिका वठवली. परंतु, किश्वर आणि सुयश हे खऱ्या आयुष्यात एकत्र येतील असा कोणी विचारही केला नव्हता. त्यामुळे किश्वर-सुयशने जेव्हा त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली तेव्हा ते चाहत्यांना धक्का बसला.
दरम्यान, किश्वर मर्चंट आणि सुयश राय यांच्यामध्ये ८ वर्षांचं अंतर आहे. शिवाय या दोघांचे धर्म वेगवेगळे असल्याने सुरुवातीला त्यांचे कुटुंबीयांचा या नात्याला विरोध होता. बऱ्याच अडचणींचा सामना केल्यानंतर या कपलने २०२६ मध्ये लग्नगाठ बांधली.
कोण आहे किश्वर मर्चंट?
किश्वर मर्चंटचा जन्म इस्मायली मुसलमान कुटुंबात झाला. किश्वर मुंबईतच लहानाची मोठी झाली. तिने अनेक मालिका आणि रियालिटी शो मध्ये काम केलं आहे.1997 साली किश्वरने शक्तिमान या मालिकेतून अभिनयात पदार्पण केलं. यानंतर ती 'देश मे निकला होगा चांद','हातीम','कसोटी जिंदगी की' आणि 'खिचडी' अशा काही गाजलेल्या मालिकांमध्ये दिसली. 'मिले जब हम तूम', 'प्यार की ये एक कहानी' यात ती नवोदित कलाकारांसोबत झळकली.