हिना खानच्या फोटोशूटमध्यल्या पोज पाहून चाहते थक्क, करतायेत अशा कमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 14:59 IST2022-01-11T14:58:10+5:302022-01-11T14:59:41+5:30

हिना खानने (Hina Khan) तिच्या इंस्टाग्रामवर हिरव्या रंगाच्या ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत. सध्या तिच्या याच फोटोने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Hina Khans this attire caughts attention of viewers, fans say Chameleon beauty | हिना खानच्या फोटोशूटमध्यल्या पोज पाहून चाहते थक्क, करतायेत अशा कमेंट्स

हिना खानच्या फोटोशूटमध्यल्या पोज पाहून चाहते थक्क, करतायेत अशा कमेंट्स

हिना खानच्या (Hina Khan)  संपूर्ण कुटुंबाला सध्या कोरोनाची लागण झाली आहे. हिना सध्या एकटीच कुटुंबाची काळजी घेत आहे. 24 तास मास्कमध्ये राहून कुटुंबाच्या तब्येतीची काळजी घेत आहे. सोशल मीडियावर तिची कोरोनामुळे झालेली अवस्था तिने सांगितली होती. सतत मास्क चेहर्‍यावर असल्यामुळे चेहर्‍यावरही त्याच्या खुना उमटल्या आहेत. या कठीण काळातही हिना सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे. सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. ती दररोज तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. हिनाने पुन्हा एकदा तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिने अतिशय बोल्ड  ड्रेस परिधान केला आहे, मात्र तिने दिलेली पोज पाहून चाहते तिला गिरगिट म्हणताना दिसत आहेत.


हिना खानने तिच्या इंस्टाग्रामवर हिरव्या रंगाच्या ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत. सध्या तिच्या याच फोटोने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. तिने साइड कट स्लिट ड्रेस घालून काही पोज दिल्या आहेत.या ड्रेसवर तिने पिवळ्या रंगाच्या हिल्स परिधान केला आहे. यासह तिने आपले केसांची पोनीटेल स्टाईल केली आहे.हिनाने वॉर्डरोबवर चढून क्लिक केलेला फोटो सध्या व्हायरल होत आहे. कधी आडवे तर कधी बसलेले असे तिने फोटो काढले आहेत. हिना खानचा फोटोसाठी अतरंगीपणा पाहून चाहतेही भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. काहींना हिनाची स्टाईल तर काहींना तिचा ड्रेस प्रचंड आवडला आहे. एका चाहत्याने लिहिले की, तू गिरगिटसारखीच दिसतेस.ही अशी कोणती पोझ आहे. असे प्रश्न विचारत तिची थट्टाही करताना दिसत आहे.

नुकतेच न्यूयॉर्कमध्ये न्यू इयर सेलिब्रेट केल्यानंतर हिना खान तिचा बॉयफ्रेंड रॉकी जैस्वालसोबत मुंबईत पोहोचली. हिना खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर यापूर्वी अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये दिसली होती.'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतून अक्षरा भूमिकेमुळे ती प्रचंड प्रसिद्ध झाली. नंतर 'कसौटी जिंदगी की २' आणि 'बिग बॉस', 'खतरों के खिलाडी' अशा रिएलिटी शोमध्येही ती झळकली होत.

Web Title: Hina Khans this attire caughts attention of viewers, fans say Chameleon beauty