टीव्हीची ही संस्कारी बहू आहे सर्वाधिक महागडी अभिनेत्री, एका भागासाठी घेते इतके मानधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 10:03 IST2020-04-03T10:02:25+5:302020-04-03T10:03:06+5:30

अक्षरा या भूमिकेला रसिकांनी भरभरून प्रेम दिले.

Hina Khan is one of the highest-paid actors in the Indian television industry today-SRJ | टीव्हीची ही संस्कारी बहू आहे सर्वाधिक महागडी अभिनेत्री, एका भागासाठी घेते इतके मानधन

टीव्हीची ही संस्कारी बहू आहे सर्वाधिक महागडी अभिनेत्री, एका भागासाठी घेते इतके मानधन

हिना खान ही सर्वात जास्त अक्षरा म्हणूनच ओळखली जाते. ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेत तिने साकारेली संस्कारी बहू आजही रसिक विसरलेले नाहीत. अक्षरा या भूमिकेला रसिकांनी भरभरून प्रेम दिले. विशेष करून महिला वर्गात हिना अक्षरा म्हणून खूप लोकप्रिय आहे. तिच्यासारखे नटावे, तिच्यासारख्या साड्या, ज्वेलरी परिधान करत अगदी हिनाची कॉपी देखील महिला करतात. टीव्ही अभिनेत्री हिना खान आज लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत सहभागी झाली. हिनाला साचेबद्ध कामात अडकायचे नव्हते म्हणून तिने ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेला राम राम ठोकला. मालिका हिनावर फोकस करत नसल्याचे तिचे म्हणणे होते. म्हणूनच तिने मालिकेतून एक्झिट घेतली. त्यावेळी अक्षराची लेक नायरा आणि कार्तिक मालिकेतील प्रमुख व्यक्तीरेखा बनले. विशष म्हणजे इतके लोकप्रिय पात्राने मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतरही मालिकेच्या टीआरपीवर कोणताही परिणाम झाला नाही.  हिनानंतर बिग बॉस 11 मध्ये झळकली. 

पूर्वी कधीही न पाहिलेला हिनाचा अंदाज रसिकांना पाहायला मिळाला. संस्कारी बहूने अचानक बिनधास्त बनत शोमध्ये एंट्री केली होती. ड्रामा, फाइट, ईगो क्लॅश कॉन्ट्रोव्हर्सी सर्वकाही  असलेल्या 'बिग बॉस' मध्ये कंटेस्टंट्सना मोठी रक्कमही दिली जाते. रिपोर्ट्सनुसार, 'ये रिश्ता क्या कहलाता है' ची अक्षरा उर्फ हिना खान त्या सिझनची  सर्वाधिक महागडी कंटेस्टंट  होती.  तिला एका आठवड्यासाठी 7 ते 8 लाख रुपये दिले गेले होते.  बिग बॉसच्या आधी हिना खान 'खतरों के खिलाडी' सिझन 8 मध्ये झळकली होती. 

हिना खाननंतर एकता कपूरच्या कसौंटी जिंदगी २ मध्ये कोमोलिका बनत सा-यांच्या समोर आली मात्र खूप कमी काळच तिने या मालिकेत दर्शन घडले नंतर तिने ही मालिका सोडली आणि आपला मोर्चा बॉलिवूड सिनेमांकडे वळवला. दिवसेंदिवस मिळणा-या लोकप्रियतेमुळे हिनाने तिचे मानधनही वाढवले. मालिकांच्या एका एपिसोडसाठी  ती  2 ते 2. 5 लाख रुपये एवढे मानधन घेते. त्यामुळेच टीव्ही अभिनेत्रींमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी हिना खान महागडी अभिनेत्री ठरते.

Web Title: Hina Khan is one of the highest-paid actors in the Indian television industry today-SRJ