Hina Khan : "हे अत्यंत वेदनादायक, आता माझ्यात एनर्जी नाही..."; हिना खान रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 05:58 PM2023-12-28T17:58:38+5:302023-12-28T18:10:54+5:30

Hina Khan : लोकप्रिय अभिनेत्री हिना खानची प्रकृती बिघडली आहे

hina khan hospitalised due to high fever shared photos from hospital | Hina Khan : "हे अत्यंत वेदनादायक, आता माझ्यात एनर्जी नाही..."; हिना खान रुग्णालयात दाखल

Hina Khan : "हे अत्यंत वेदनादायक, आता माझ्यात एनर्जी नाही..."; हिना खान रुग्णालयात दाखल

लोकप्रिय अभिनेत्री हिना खानची प्रकृती बिघडली आहे. तापामुळे अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हिनाने इन्स्टा स्टोरीवर फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली. एका फोटोत ती बेडवर बसलेली दिसत आहे आणि दुसऱ्या फोटोमध्ये ती थर्मामीटरमधील रीडिंग दाखवत आहे.

अभिनेत्रीच्या शरीराचे तापमान 102 डिग्री आहे. "खूप तापामुळे मी चार भयंकर रात्री अनुभवल्या आहेत. हा ताप काही कमी होत नाही. सतत 102-103 पर्यंत ताप असतो. आता माझ्यात एनर्जी अजिबात शिल्लक राहिलेली नाही. हे अत्यंत वेदनादायक आहे. जे माझी काळजी करत आहेत, त्यांना सांगते की, मी नक्कीच कमबॅक करेन" असं अभिनेत्रीने म्हटलं आहे. 

अभिनेत्रीने चाहत्यांना त्यांचं प्रेम कायम ठेवण्याचं आवाहन केलं आहे. हिना हॉस्पिटलमधील तिच्या गेल्या दिवसांबद्दल अपडेट्स देत आहे. अभिनेत्री लवकर बरी व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. हिना खान अलीकडेच कंट्री ऑफ ब्लाइंड या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट अमेरिकेत प्रदर्शित झाला आहे.

हिना खानच्या कामाचे कौतुक होत आहे. या चित्रपटाला ऑस्कर 2024 मध्ये नामांकन मिळाले आहे. या बातमीने अभिनेत्री खूश आहे. हिना अनेक वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीवर राज्य करत आहे. आता ती चित्रपट आणि ओटीटीवर फोकस करत आहे. ती सोशल मीडियावर एक्टिव्ह असून नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. 

Web Title: hina khan hospitalised due to high fever shared photos from hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.