हिना खानने पुन्हा केले खास फोटोशूट, तर सोशल मीडियावर अशा मिळतायेत कमेंटस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 20:00 IST2018-12-16T20:00:00+5:302018-12-16T20:00:00+5:30
हिना खान प्रचंड स्टायलिश असून बिग बॉसच्या घरात असताना तिच्या स्टायलिंगची चांगलीच चर्चा झाली होती.हिना खान इन्स्टाग्रामवर चांगलीच एक्टिव्ह असून तिचे फॅन्स तिला मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात.

हिना खानने पुन्हा केले खास फोटोशूट, तर सोशल मीडियावर अशा मिळतायेत कमेंटस!
'ये रिश्ता क्या कहलाता है' या टीव्ही सीरियलमधील अक्षरा म्हणजेच हिना खानने नुकतेच एक फोटोशूट केलेय. यामध्ये हिना ब्लॅक कलरच्या ऑफ शोल्डर अँड हाय स्लिट गाउनमध्ये दिसतेय.हिनाने 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेमुळे घराघरांमध्ये पोहचलीय तब्बल एकाच मालिकेत तिने 8 वर्ष काम केले आहे. त्यानंतर ती बिग बॉस या शोमध्येही झळकली होती. आता सध्या ती 'कसौटी जिंदगी की' मालिकेत कोमोलिकाच्या भूमिकेत झळकत आहे. मिळालेल्या वेळेत हिना फोटोशूटही करताना दिसते. तिचे काही निवडक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.तिचे फोटो पाहून चाहते तिच्या या फोटोंचे कौतुक करताना दिसले तर काही तिच्यावर टीका करताना बघायला मिळतात.हिनाने छोट्या पडद्यावरील 'ये रिश्ता क्या कहलाता है'मधील सोज्वळ सून अक्षराच्या भूमिकेत दिसली होती. आता ती पहिल्यांदा निगेटिव्ह भूमिकेत झळकत आहे.
हिना खान प्रचंड स्टायलिश असून बिग बॉसच्या घरात असताना तिच्या स्टायलिंगची चांगलीच चर्चा झाली होती.हिना खान इन्स्टाग्रामवर चांगलीच अॅक्टिव्ह असून तिचे फॅन्स तिला मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात. सोशल मीडियावर हिनाचे वेगवेगळ्या अंदाजातील फोटो हॉट आणि सेक्सी असेच पाहायला मिळतायेत. त्यामुळे अक्षरा म्हणून इमेज मिरवणारी हिना आता त्या इमेज मधून बाहेर पडली असून तिला कोणत्याचे इमेजमध्ये बांधून राहायचे नाही. यासाठी ती साचेबद्ध काम करणार नसून कामात काहीतरी नाविन्य शोधण्याचा प्रयत्न करत रसिकांच्या भेटीला येणार असेही तिने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते.
छोट्या पडद्यावर आपले नशीब आजमवल्यानंतर आता तर हिना थेट बॉलिवूडला निघाली आहे. होय, लवकरच हिना एका चित्रपटात दिसणार आहे. हिनानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हा चित्रपट एक महिलाप्रधान चित्रपट असल्याचे तिने सांगितले. शिवाय बॉलिवूडमध्ये संधी मिळाल्याने प्रचंड उत्सूक असल्याचेही सांगितले. यात ती एका स्वतंत्र बाण्याच्या मुलीची भूमिका साकारताना दिसेल. या चित्रपटाची कथा ९० च्या दशकातील काश्मिरवर आधारित आहे. हुसैन खान दिग्दर्शित या चित्रपटाची कथा राहत काजमी आणि शक्ती सिंह यांनी लिहिलीय.