हिमेश रेशमियाने त्याच्या चाहत्याचे केले हे स्वप्न पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 06:00 IST2019-05-31T06:00:00+5:302019-05-31T06:00:03+5:30

सुपर डान्सर या कार्यक्रमात जावेद अली, हिमेश रेशमिया, सलमान अली, सचिन वाल्मिकी हजेरी लावणार आहेत. ते या कार्यक्रमात त्यांच्या सुपरस्टार सिंगर या आगामी कार्यक्रमाचे प्रमोशन करणार आहेत. 

Himesh Reshammiya's fanbase revealed on Super Dancer Chapter 3 | हिमेश रेशमियाने त्याच्या चाहत्याचे केले हे स्वप्न पूर्ण

हिमेश रेशमियाने त्याच्या चाहत्याचे केले हे स्वप्न पूर्ण

ठळक मुद्दे‘आशिक बनाया आपने’ आणि ‘तेरा सुरूर’ ही तुमची गाणी तर मी नेहमीच ऐकतो. माझे एक अनेक वर्षांपासूनचे स्वप्न आहे की, मला तुम्हाला माझ्या रिक्षात बसवायचे आहे आणि तुमचे गाणे ऐकायचे आहे. हिमेशने देखील लगेचच त्यांची ही इच्छा पूर्ण केली.

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सुपर डान्सर 3 हा शो सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांचा अत्यंत आवडता लहान मुलांचा डान्स रिअॅलिटी शो बनला आहे. यातील लहान मुलांच्या अद्भुत नृत्य कौशल्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे आणि त्यामुळे तो टीआरपीमध्ये सतत आघाडीवर असतो. शिवाय दर आठवड्याला या कार्यक्रमात लोकप्रिय कलाकार स्पर्धकांचे मनोबल वाढवण्यासाठी उपस्थिती लावत असतात. त्यामुळे हा कार्यक्रम आणखीनच मनोरंजक होतो. येत्या आठवड्यात या कार्यक्रमात जावेद अली, हिमेश रेशमिया, सलमान अली, सचिन वाल्मिकी हजेरी लावणार आहेत. ते या कार्यक्रमात त्यांच्या सुपरस्टार सिंगर या आगामी कार्यक्रमाचे प्रमोशन करणार आहेत. 

सुपर डान्सर या कार्यक्रमातील स्पर्धक अक्षित आणि त्याचे गुरू विवेक यांच्या परफॉर्मन्सनंतर अक्षितने हिमेशला सांगितले की, त्याचे वडील हिमेशचे मोठे चाहते आहेत आणि त्यांना हिमेशशी बोलायचे आहे. हिमेशने त्याच्या विनंतीला मान देऊन अक्षितचे वडील राजन भंडारी यांना लगेचच मंचावर बोलावले. त्यांनी हिमेशला सांगितले की, माझ्या प्रमाणेच ऑटो चालवणारे अनेकजण तुमचे चाहते आहेत. आम्हाला तुमची गाणी ऐकायला खूप आवडतात. ‘आशिक बनाया आपने’ आणि ‘तेरा सुरूर’ ही तुमची गाणी तर मी नेहमीच ऐकतो. माझे एक अनेक वर्षांपासूनचे स्वप्न आहे की, मला तुम्हाला माझ्या रिक्षात बसवायचे आहे आणि तुमचे गाणे ऐकायचे आहे.

हिमेशने देखील लगेचच त्यांची ही इच्छा पूर्ण केली. याविषयी अक्षित सांगतो, “हिमेश सरांनी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची तयारी दाखवली तेव्हा माझे वडील खूपच खुश झाले होते. माझ्या वडिलांसोबतच्या ऑटो राइड दरम्यान हिमेश यांनी ‘एक बार आजा’, ‘आ आ आशिकी में तेरी’ यांसारखी अनेक गाणी म्हटली. एवढेच नव्हे तर ‘नाम तेरा तेरा’, ‘चलाओ ना नैनों से बाण रे, जान ले लो ना जान रे’ ही गाणी माझ्या वडिलांनी देखील त्यांच्यासोबत गायली. 

सुपर डान्सर हा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आला असून या स्पर्धकांमधून सुपर डान्सर कोण ठरणार याची निवड प्रेक्षक करणार आहेत. 

Web Title: Himesh Reshammiya's fanbase revealed on Super Dancer Chapter 3