हे राम ! मुंबईच्या रस्त्यांवर अशा अवस्थेत फिरत होती रामानंद सागर यांची पणती Sakshi Chopra
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 17:14 IST2021-12-18T17:13:47+5:302021-12-18T17:14:00+5:30
प्रोड्यूसर मीनाक्षी सागरची साक्षी (Sakshi Chopra) चोप्रा मुलगी आहे. साक्षी चोप्राची रामानंद सागर यांची पणती अशी ओळख असली तरी ती एक गायिका आहे.

हे राम ! मुंबईच्या रस्त्यांवर अशा अवस्थेत फिरत होती रामानंद सागर यांची पणती Sakshi Chopra
'रामयण' आठवताच रामानंद सागर यांची आठवण झाल्याशिवाय राहात नाही.त्यामुळे रामानंद सागर यांचा वारसाही पुढे चालवणारे त्यांचे कुटुंबिय नेमके कसे असतील, काय करतात याविषी कुतुहूल निर्माण होणे साहजिकच आहे. त्यांची पणतीनेही तिच्या कामामुळे नावारूपाला यावे असेच सा-यांना अपेक्षित होते. मात्र रामानंद सागर यांची पणती साक्षी चोप्रा नेहमी वेगळ्याच कारणामुळे चर्चेत असते.आता पुन्हा एकदा साक्षी चोप्रा चर्चेत आली आहे. तेही तिच्या बोल्ड फोटोमुळेच.
रामानंद सागर यांची पणती साक्षी चोप्रा तिच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत असते. अलीकडेच, साक्षी चोप्रा मुंबईच्या रस्त्यावर दिसली जिथे तिने गुलाबी रंगाचा एक अतिशय बोल्ड ड्रेस परिधान केला होता. या आउटफिटमध्ये साक्षी खूपच बोल्ड दिसत होती. पाहणारेही तिला पाहतच राहिले. या आउटफिटमध्ये साक्षीची टोन्ड बॉडी फ्लॉंट केल्याचे पाहायला मिळतंय.काही युजर्स तिच्या या लुकचे कौतुक करत आहेत, तर काही युजर्स तिच्यावर टीका करत आहेत.
इन्स्टाग्रामवर साक्षी चांगलीच प्रसिद्ध आहे.साक्षीच्या बिकिनी फोटोपासून ते सिझलिंग फोटोशूटपर्यंत सगळ्याच अंदाजतले फोटो व्हायरल होत असतात. साक्षीच्या इंस्टाग्राम फॅन फॉलोअर्सबद्दल सांगायचे झाले तर, तिला 5 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. मात्र, यावेळी तिचे नवीन फोटो मीडियाच्या फोटोग्राफर्सनी व्हायरल केली आहेत. साक्षी चोप्राला बॉलिवूडमध्ये फारसा रस नसला तरी चाहत्यांना तिला सिनेमांमध्ये पाहायचे आहे.
प्रोड्यूसर मीनाक्षी सागरची साक्षी चोप्रा मुलगी आहे. साक्षी चोप्राची रामानंद सागर यांची पणती अशी ओळख असली तरी ती एक गायिका आहे.साक्षी मॉडेल असण्यासोबतच गीतकार देखील आहे. साक्षी व्हिडीओ ब्लॉगरसुद्धा आहे.तिचे अनेक व्हिडीओ यू ट्यूबवर हिटही झाले आहेत. साक्षीने लंडनच्या ट्रिनिटी स्कूलमधून अभिनयाचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर कॅलिफोर्नियातील ली स्ट्रासबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्यूटमधून फिल्म मेकिंगचा कोर्सही केला आहे. साक्षी गेल्या काही वर्षांपासून दिवसांपासून लॉस एंजिलिसमध्ये राहते.साक्षीचे ज्या रितीने तिच्यात कामात मन रमवत आहे. करिअर घडवण्याचा प्रयत्न करत आहे हे सगळं बघून खूप आनंदच नाही तर अभिमान वाटत असल्याचे कुटुंबाने म्हटले होते.