​शोलेमधील या दृश्याची हेमा मालिनी यांनी केली पुनरावृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 17:42 IST2018-01-25T12:12:10+5:302018-01-25T17:42:10+5:30

शोले या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडी देखील कमी झाली नाही. या चित्रपटातील ...

Hema Malini repeated this view of Sholay | ​शोलेमधील या दृश्याची हेमा मालिनी यांनी केली पुनरावृत्ती

​शोलेमधील या दृश्याची हेमा मालिनी यांनी केली पुनरावृत्ती

ले या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडी देखील कमी झाली नाही. या चित्रपटातील वीरू, जय, बसंती, ठाकूर, गब्बर या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या चित्रपटातील गाणी देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. तसेच या चित्रपटातील सगळेच संवाद आजही प्रेक्षकांचे तोंडपाठ आहेत. या चित्रपटात वीरू म्हणजेच धर्मेंद्र आणि जय म्हणजेच अमिताभ बच्चन हे बसंती म्हणजेच हेमा मालिनी यांना सगळ्यात पहिल्यांदा भेटतात ते दृश्य तर प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. टांग्यातून जय आणि वीरूला रामगडला सोडताना बसंतीची सुरू असलेली बडबड प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. हेच दृश्य ४० वर्षांनंतर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हे दृश्य प्रेक्षकांना कोणत्या चित्रपटात नव्हे तर एका कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे.
डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमात हेमा मालिनी यांनी नुकतीच हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील चिमुकल्यांचा परफॉर्मन्स पाहून त्या खूपच खूश झाल्या होत्या. या कार्यक्रमात त्यांनी शोले या चित्रपटातील एका दृश्याची अनेक वर्षांनी पुनरावृत्ती केली. जय आणि वीरूला बसंती टांग्याने घेऊन जाते हे दृश्य हेमा मालिनीने या कार्यक्रमाचे परीक्षक मर्झी आणि मुद्दसर यांच्यासोबत केले. मर्झी आणि मुद्दसर हे जय आणि वीरूच्या भूमिकेत होते. हे दृश्य चाळीस वर्षांनंतर हेमा मालिनी पुन्हा करत असल्याने त्या खूपच खूश झाल्या होत्या. त्यांनी या कार्यक्रमात त्यांच्या बीयाँड द ड्रीम गर्ल या पुस्तकाचे अनावरण देखील केले. हे पुस्तक त्यांच्या आयुष्यावर आधारित आहे.
‘झी टीव्ही’वरील ‘डान्स इंडिया डान्स’ हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या कार्यक्रमात प्रत्येक स्पर्धक एकाहून एक परफॉर्मन्स सादर करत असून आता कोणता स्पर्धक बाजी मारणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. या कार्यक्रमात बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता मिथुन चक्रवर्ती प्रेक्षकांना ग्रॅण्डमास्टरच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे तर मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर या कार्यक्रमात सूत्रसंचालनाच्या भूमिकेत झळकत आहे. 

Also Read : 

Web Title: Hema Malini repeated this view of Sholay