'त्याने दरवाजा बंद केला अन्....', Sajid Khanवर मॉडलनं केला धक्कादायक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 11:53 AM2022-11-10T11:53:33+5:302022-11-10T11:59:08+5:30

साजिद खानवर आतापर्यंत अनेकजणींनी लैंगिक शोषण केल्याचे आरोप केले आहेत. आता एका मॉडलनं साजिदवर धक्कादायक आरोप केले आहेत.

'He closed the door and...', the model made a shocking allegation on Sajid Khan | 'त्याने दरवाजा बंद केला अन्....', Sajid Khanवर मॉडलनं केला धक्कादायक आरोप

'त्याने दरवाजा बंद केला अन्....', Sajid Khanवर मॉडलनं केला धक्कादायक आरोप

googlenewsNext

चित्रपट निर्माता साजिद खान (Sajid Khan) छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस 16 मध्ये स्पर्धक म्हणून दिसत आहे. तो शोमध्ये गेल्यापासून, त्याच्यावर लैंगिक शोषण(Sexual Harrasment)चे आरोप करण्यात आले आहेत. अनेक स्त्रिया एकापाठोपाठ एक आपल्यासोबत घडलेल्या घटना मीडियासमोर सांगताना दिसतायेत. मॉडेल नम्रता शर्मा सिंह (Namrata Sharma Singh) साजिदवर धक्कादायक आरोप केले आहेत. 

मॉडेलने केलं लैंगिक छळाचा आरोप 
साजिद खानवर Me tooदरम्यान 10 महिलांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.आता नम्रता शर्मा सिंहने साजिदने काम देण्याच्या नावाखाली आपल्यासोबत कोणते कृत्य केले हे सांगितले. दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार, नम्रता शर्मा सिंहने सांगितले की, साजिदने 2011 मध्ये तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता.

नम्रताने सांगितले की ती एका ऑडिशनच्या निमित्ताने साजिद खानला भेटली होती आणि भूमिकेनुसार तिने शॉर्ट ड्रेस घातला होता. नम्रताच्या म्हणण्यानुसार, ती खोलीत शिरताच साजिदने खोली बंद केली. ती म्हणाली- 'खरं तर मी तिथे ऑडिशन आणि फीसाठी साजिद खानशी बोलायला गेले होते. दरवाजा बंद केल्यानंतर त्याने मला अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. मी आरडा-ओरडा करून त्याला धक्काबुक्की केली.

नम्रता शर्मा सिंहच्या म्हणण्यानुसार, अनेकांनी तिला सांगितले की साजिद त्याच्या चित्रपटात मुलींना तेव्हाच काम देतो जेव्हा त्या तडजोड करायला तयार होतात. या घटनेनंतर साजिदने तिला कधीही फोन केला नाही. 

Web Title: 'He closed the door and...', the model made a shocking allegation on Sajid Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.