'आई कुठे काय करते'मधील या कलाकारांचा फॅमिली फोटो पाहिलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 07:00 IST2022-02-01T07:00:00+5:302022-02-01T07:00:00+5:30

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांचे कुटुंबीय कसे दिसतात, ते काय करतात याबद्दल जाणून घेण्याची अनेकांना इच्छा असते.

Have you seen the family photos of these actors in 'Aai Kuthe Kay Karte' | 'आई कुठे काय करते'मधील या कलाकारांचा फॅमिली फोटो पाहिलंत का?

'आई कुठे काय करते'मधील या कलाकारांचा फॅमिली फोटो पाहिलंत का?

स्टार प्रवाह या वाहिनीवर आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका गेल्या २ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करते आहे. या मालिकेतील पात्रांना प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. तसेच या कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी चाहतेदेखील उत्सुक आहेत. या मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांचे कुटुंबीय कसे दिसतात, ते काय करतात याबद्दल जाणून घेण्याची अनेकांना इच्छा असते. या मालिकेतील कलाकारांच्या कुटुंबाबद्दल जाणून घेऊयात.

अरुंधती –

अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर साकारत आहे. मधुराणी हिच्या पतीचे नाव प्रमोद प्रभुलकर असे आहे. या दोघांना एक मुलगी असून तिचे नाव स्वराली असे आहे.

संजना –

आई कुठे काय करते मालिकेत रुपाली भोसले हिने संजनाची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. सध्या ती ३९ वर्षांची आहे. तिच्या भावाचे नाव संकेत भोसले असे आहे. तिचा पहिला घटस्फोट झाला आहे. ती अंकित मगरे या बिझनेसमनला काही दिवसांपूर्वी डेट करत होती. मात्र आता त्यांचे ब्रेकअप झाल्याचे समजते.

अभिषेक देशमुख –

आई कुठे काय करते या मालिकेमध्ये अभिषेक देशमुख यश ही भूमिका साकारत आहे. खऱ्या आयुष्यात त्याचे लग्न झाले असून त्याच्या पत्नीचे नाव कृतिका देव असे आहे. तीदेखील अभिनेत्री आहे. आईचे नाव वैशाली देशमुख तर वडिलांचे नाव सतीश देशमुख असे आहे. 

अपूर्वा गोरे –

अपूर्वा गोरे हिने या मालिकेमध्ये ईशाची भूमिका केली आहे अपूर्वा गोरे हिच्या भावाच्या अंकित गोरे असे आहे.

गौरी कुलकर्णी –

आई कुठे काय करते मालिकेतून गौरी कुलकर्णी घराघरात पोहचली आहे. तिची भूमिका अनेक प्रेक्षकांना आवडत असते. गौरी कुलकर्णी ही आई-वडिलांसोबत राहते.

Web Title: Have you seen the family photos of these actors in 'Aai Kuthe Kay Karte'