'माझी तुझी रेशीमगाठ'च्या मेकअप रूममधील मायरा आणि प्रार्थना बेहरेचा ड्रामा पाहिलात का?, पहा हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 01:09 PM2021-09-17T13:09:07+5:302021-09-17T13:10:57+5:30

प्रार्थना बेहरेने इंस्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Have you seen the drama of Myra and Prarthana Behere in the makeup room of 'My Your Silk Tie' ?, watch this video | 'माझी तुझी रेशीमगाठ'च्या मेकअप रूममधील मायरा आणि प्रार्थना बेहरेचा ड्रामा पाहिलात का?, पहा हा व्हिडीओ

'माझी तुझी रेशीमगाठ'च्या मेकअप रूममधील मायरा आणि प्रार्थना बेहरेचा ड्रामा पाहिलात का?, पहा हा व्हिडीओ

googlenewsNext

छोट्या पडद्यावर नुकतीच 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका दाखल झाली आहे. या मालिकेला अल्पावधीत खूप चांगला रिस्पॉन्स मिळताना दिसत आहे. या मालिकेतून प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत आहेत. या दोघांव्यतिरिक्त संकर्षण कऱ्हाडे आणि मोहन जोशीदेखील प्रमुख भूमिकेत पहायला मिळत आहेत. तसेच या मालिकेत टिक टॉक स्टार मायरा वायकुळ परीच्या भूमिकेत दिसते आहे. मायरा आणि प्रार्थना माझी तुझी रेशीमगाठ मालिकेच्या सेटवर धमालमस्ती करतानाचे व्हिडीओ शेअर करताना दिसत असते. नुकताच प्रार्थना बेहरेने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

प्रार्थना बेहरे हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत लिहिले की, मेकअप रूम ड्रामा..मी आणि मायरा. या व्हिडीओत मायरा आरशासमोर बसून मेकअप करताना दिसते आहे. त्यावेळी प्रार्थनाने मायराला विचारले की तुला ही लिपस्टिक कोणी लावली. त्यावर मायरा म्हणाली की तू. त्यावर प्रार्थनाने सांगितले की कोणी दुसऱ्याने विचारले तर काय सांगशील. तर मायरा म्हणते माझे लिप्स असेच आहेत. या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळते आहे.

 
माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतून श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे हे कलाकार पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसत आहे. त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावते आहे.

सुरुवातीपासून मालिकेने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती. या मालिकेतील मुख्य कलाकारांप्रमाणे इतर कलाकारांच्याही भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

Web Title: Have you seen the drama of Myra and Prarthana Behere in the makeup room of 'My Your Silk Tie' ?, watch this video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.