'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील परीचा डान्स पाहिलात का?, पाहून म्हणाल- 'क्या बात है..!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 11:22 IST2021-09-11T11:21:41+5:302021-09-11T11:22:25+5:30

'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेतील परीने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

Have you seen dance of Mazi Tuzi Resheemgath fame Pari ? | 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील परीचा डान्स पाहिलात का?, पाहून म्हणाल- 'क्या बात है..!'

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील परीचा डान्स पाहिलात का?, पाहून म्हणाल- 'क्या बात है..!'

झी मराठी वाहिनीवर नुकतीच 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेला कमी कालावधीत प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे हे मुख्य भूमिकेत आहेत. तर संकर्षण कऱ्हाडे, मोहन जोशी हे प्रमुख भूमिकेत आहे. मात्र या मालिकेत सर्वांचे लक्ष वेधले आहे ते या मालिकेतील छोट्या परीने. मालिकेतील नेहाची मुलगी परी हिचे खरे नाव मायरा वायकुळ असे आहे.

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील परी म्हणजेच मायरा वायकुळ सर्वांचेच लक्ष वेधून घेते आहे. तिची निरागसता, बोलण्यातील साधेपणा आणि हसणे, मुरडणे, रुसणे पाहायला खूपच मजा येते. तिचा अभिनय देखील अप्रतिम आहे. खरंेतर मालिकेच्या प्रोमोपासूनच तिला सर्वांची पसंती मिळताना दिसली. 


काही दिवसांपूर्वी मायराने अशी ही बनवा बनवी चित्रपटातील हृदयी वसंत फुलताना या गाण्यावर अप्रतिम डान्स केला. या व्हिडिओला तिच्या चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. गाण्यावर ठेका त्यातील हावभाव ती उत्तमरीत्या करताना पाहायला मिळते. 


खरेतर या मालिकेआधीदेखील तिचे अनेक चाहते होते. मायरा वायकुळने टिक टॉक सारख्या व्हिडीओजच्या माध्यमातून प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. टिक टॉक स्टार म्हणूनही तिची ओळख आहे. इन्स्टाग्रामवरही तिचे खूप फॉलोअर्स आहेत. युट्युबवर Myra’s corner World Of Myra and Family आणि नावाने मायराचे चॅनेल देखील आहे. 


मायरा आपल्या कुटुंबासोबत मुंबईत राहते. मायराचे वडील गौरव वायकुळ आणि आई श्वेता थोरात वायकुळ हे दोघेही मायराला सतत प्रोत्साहन देत असतात. आपल्या मुलीत काहीतरी खास आहे या उद्देशाने त्यांनी सुरुवातीला तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केले आणि काही दिवसातच तिला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेच्या सेटवर देखील अभिनेत्यांना तिच्यासोबत व्हिडिओ काढायचा मोह होतो आणि त्यांचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर पहायला मिळतात. 

Web Title: Have you seen dance of Mazi Tuzi Resheemgath fame Pari ?