हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंग करणार आता या नव्या शोचे सूत्रसंचालन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 19:18 IST2022-03-15T19:12:40+5:302022-03-15T19:18:57+5:30

करण कुंद्रा, प्रतीक सहजपाल, निशांत भट्ट, पुनीत पाठक आणि विशाल आदित्य सिंग भाग घेणार आहेत.

Harsh Limbachia and Bharti Singh will now host the new show | हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंग करणार आता या नव्या शोचे सूत्रसंचालन

हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंग करणार आता या नव्या शोचे सूत्रसंचालन

हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंग आपल्याला खतरा खतरा शोमध्ये फरहा खान फ्रायडे स्पेशल होस्ट म्हणून आपल्याला दिसणार आहे.  या शो चे प्रसारण हे १३ मार्च  २०२२  पासून सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ७ वाजता व्हूट वर तर त्यानंतर रात्री ११ वाजता कलर्स वर करण्यात येणार आहे.  या शोच्या पहिल्या भागात प्रसिध्द सेलिब्रिटी स्पर्धक  करण कुंद्रा, प्रतीक सहजपाल, निशांत भट्ट, पुनीत पाठक आणि विशाल आदित्य सिंग भाग घेणार आहेत.  त्याचबरोबर त्यांच्या सोबत बॉलिवूड अभिनेत्री  जॅकलीन फर्नांडिसही असेल जी या सूत्रसंचालकांबरोबर दिसले. 

यामध्ये आपल्याला १५० हून अधिक मजेदार गेम्स आणि टास्क्स,विनोदी साहसे आणि  प्रेक्षकांना त्यांच्या आवडीचे सेलिब्रिटीज अनोखे विनोद सादर करतील जेणेकरून प्रेक्षक या स्क्रीनला जोडलेल राहतील. पहिल्या भागात आपल्याला एक ‘फरहा का चॅलेंज’ हा विशेष सेग्मेंट पहायला मिळणार असून यामध्ये फरहा वापरकर्त्यांना एक आव्हान देणार असून त्याचे व्हिडिओज अपलोड करायचे आहेत.  या शो मध्ये अनेक संभाषणात्मक सेग्मेंट्स असतील ज्यांत फरहा के फनकार, डिमांड पे रिमांड, इंडिया की फटकार, अनाड़ी नं १ आणि खतरा फन ‍ मीटर यांचा समावेश असून या माध्यमातून प्रेक्षकांना स्पर्धकांनी केलेले खेळ निवडून त्यांना शिक्षा देऊन, एपिसोडला रेटिंग देणे इत्यादी कामे करायची आहेत.

 फरहा खान म्हणते “ भारती आणि हर्शच्या विनोदी पध्दतीची एक फॅन म्हणून मला या दि खतरा खतरा शो मध्ये सहभागी होतांना खूपच आनंद वाटतो.  शो ची फ्रायडे स्पेशल होस्ट म्हणून मी अतिशय उत्साहाने देशातील आवडीच्या सेलिब्रिटीज समोर आव्हानात्मक गोष्टी ठेवतांना मला आनंद होत आहे.  ते त्यांच्या चाहत्यांसाठी एक मोठे सरप्राईज असेल.  हा शो या कलाकारांची ऑफस्क्रीन धमाल आकर्षक गेम्स आणि आनंददायी शिक्षांच्या माध्यमातून दाखवणार आहे.” 
 

Web Title: Harsh Limbachia and Bharti Singh will now host the new show