हर्षने एका आठवड्यात केले 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 11:34 IST2018-08-28T11:33:09+5:302018-08-28T11:34:45+5:30

‘स्टार प्लस’वरील ‘नजर’ मालिकेत अंश राठोडची भूमिका साकारणारा हर्ष राजपूतने आपली व्यक्तिरेखा उभी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली असून स्वत:त बदल करून घेतला आहे.

Harsh done 'this' work in a week | हर्षने एका आठवड्यात केले 'हे' काम

हर्षने एका आठवड्यात केले 'हे' काम

ठळक मुद्दे हर्ष राजपूत अंशची भूमिका साकारण्यासाठी घेतोय प्रचंड मेहनत

‘स्टार प्लस’वरील ‘नजर’ मालिकेत अंश राठोडची भूमिका साकारणारा हर्ष राजपूतने आपली व्यक्तिरेखा उभी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली असून स्वत:त बदल करून घेतला आहे. मालिकेत तो अंशची भूमिका साकारीत असला, तरी त्याला विविध पूजांचे प्रसंग उभे करण्यासाठी वेगवेगळ्या आरत्या पाठ कराव्या लागल्या होत्या. मालिकेतील काही आगामी प्रसंगांसाठी हर्षला एका आठवड्यात तब्बल पाच आरत्या पाठ कराव्या लागल्या होत्या. 

 हर्ष सांगतो, “अंशची व्यक्तिरेखा केवळ सर्वांचा आवडता मुलगा इतक्यापुरतीच मार्यादित नाही. तो आपली आई वेदश्री हिच्याबरोबरीने अनेक पूजांमध्ये सहभागी होत असतो आणि तो आरत्याही म्हणत असतो. माझ्या व्यक्तिरेखेला वास्तववादी करण्यासाठी एका प्रसंगासाठी मला एका आठवड्यात पाच आरत्या तोंडपाठ कराव्या लागल्या होत्या. राठोड कुटुंबियांसाठी या आरत्या म्हणणे अतिशय गरजेचं असतं, कारण त्यामुळेच त्यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या दुष्ट शक्ती दूर राहू शकतात. त्यामुळेच या आरत्या मलाही तोंडपाठ कराव्या लागल्या. मला केवळ त्या आरत्यांसाठी माझे ओळ हलवायचे नव्हते. या प्रसंगासाठी तयारी करतना मला खूप मजा येत होती आणि प्रेक्षकांनाही हा प्रसंग पसंत पडेल, अशी आशा करतो.”

नजर मालिकेत दुष्ट खलनायक आणि अमानवी शक्तींची अंगावर काटा आणणारी कथा आणि कॉलेजातील प्रेमकथा यांचा मिलाफ झाला आहे. प्रेक्षकांना अंश लवकरच एका सामान्य तरुण मुलाच्या रूपात दिसेल. त्याला आपले खरे आई-वडील कोण आणि त्यांचे काय झाले, याची काहीही कल्पना नसते. 

 

Web Title: Harsh done 'this' work in a week

टॅग्स :Nazarनजर