Akshaya Deodhar : ज्यांच्या हट्टामुळे हार्दिक व अक्षयाचं लग्न झालं, त्या पाठकबाईंच्या सासूबाई दिसतात तरी कशा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 13:22 IST2023-01-04T13:19:30+5:302023-01-04T13:22:14+5:30

Akshaya Deodhar : लग्नानंतर सासूबाईंनी अक्षयाला आपलंस केलं आहे. त्या लेकीसारखं तिच्यावर प्रेम करतात.

Hardeek Joshi mother and Akshaya Deodhar mother-in-law photo | Akshaya Deodhar : ज्यांच्या हट्टामुळे हार्दिक व अक्षयाचं लग्न झालं, त्या पाठकबाईंच्या सासूबाई दिसतात तरी कशा?

Akshaya Deodhar : ज्यांच्या हट्टामुळे हार्दिक व अक्षयाचं लग्न झालं, त्या पाठकबाईंच्या सासूबाई दिसतात तरी कशा?

अक्षया देवधर (Akshaya Deodhar)आणि हार्दिक जोशी (Hardeek Joshi) दोघंही महिनाभरापूर्वी लग्नबंधनात अडकले.  लग्नाला महिना पूर्ण झाल्यानिमित्त अक्षया व हार्दिकने एक खास व्हिडीओ शेअर केला होता आणि या व्हिडीओ त्यांनी आपल्या लव्हस्टोरी सांगितली होती. या व्हिडीओत एका व्यक्तिचा खास उल्लेख झाला. ती व्यक्ती म्हणजे हार्दिकची आई आणि अक्षयची सासूबाई. होय, आईनेच हार्दिकच्या मागे लग्नासाठी तगादा लावला होता. शिवाय तुला ती (अक्षया) आवडते तर एकदा विचारून बघ, असं आई म्हणाल्यावर हार्दिकने अक्षयाला लग्नासाठी विचारलं होतं. एकंदर काय तर हार्दिकच्या आईमुळेच पाठक बाई व राणादाची लव्हस्टोरी लग्नापर्यंत पोहोचली.  साहजिकच पाठकबाईंच्या सासूबाई नक्की आहेत तरी कशा? हे पाहण्याची, जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. 

तर आता अक्षया व हार्दिकच्या लग्नसोहळ्यातले सासूबाईंचे फोटो समोर आले आहेत. अक्षया आणि हार्दिक यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. यातल्या एका फोटोने  अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. या फोटोत अक्षयासोबत एक महिला दिसत आहे.  ही महिला दुसरी-तिसरी कोणी नसून अक्षयाच्या सासूबाई आहेत. अक्षयाच्या सासूबाईचं नाव गौरी जोशी आहे. अक्षया व हार्दिकने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत एकत्र काम केलं, तेव्हापासूनच अक्षया गौरी यांना आवडली होती. हार्दिकला अक्षया आवडते, हे त्यांनी कधीच ओळखलं होतं. त्यामुळे त्यांनीच हार्दिकला बोलतं केलं. इतकंच नाही तर एकदा विचारून तर बघ, असं म्हणत त्याच्याभोवती तगादा लावला आणि मग पुढचं सगळं जुळून आलं. लग्नानंतर सासूबाईंनी अक्षयाला आपलंस केलं आहे. त्या लेकीसारखं तिच्यावर प्रेम करतात.


  
आईने हट्ट केला म्हणून...
अक्षया व हार्दिकची लव्हस्टोरी लव्हस्टोर सुरू झाली होती ती हार्दिकच्या आईच्या हट्टामुळे. विश्वास बसत नाहीये ना? पण हे खरं आहे. खुद्द हार्दिकने एका कार्यक्रमात हा खुलासा केला होता. तो म्हणाला होता, ‘एक दिवस माझी आई माझ्याकडे आली. ‘एकदा विचारुन बघ ना. मी तसंही तिला (अक्षयाला) एकदा विचारलं आहे. तू जरा परत विचारुन बघ, असं ती मला म्हणाली. मी अवाक् झालो होतो. मी तिला समजावलं. अगं आई,मी विचारलं ना तर ती माझ्याशी जेवढं बोलते तेवढंही बोलणार नाही. तेही बंद करेल. प्लीझ नको..., असं मी म्हणालो. त्यावर आई हट्टालाच पेटली. अरे प्लीज विचारून बघ ना, म्हणून मागेच लागली. अखेर आईच्या इच्छेखातर, एकदा विचारूनच बघू, असा विचार मी केला. मग मी तिला थेट जाऊन विचारलंच.

माझ्या आईची इच्छा आहे की आपण लग्न करावं. तर तुझं काय मत आहे? असं मी तिला थेटच बोललो. यावर ठीक आहे, फक्त एकदा घरी बोल. मला काहीही प्रॉब्लेम नाहीये, असं अक्षया म्हणाली. त्यानंतर मी  तिच्या घरी जाऊन बोललो. तेव्हा लग्नाचा काहीही विचार केला नव्हता. त्यावर ठिक आहे आम्ही विचार करुन सांगतो, असं त्यांनी म्हटलं आणि त्यानंतर थेट सहा महिन्यांनी तारखाच सांगितल्या. मी माझ्या नव्या मालिकेचं शूटींग करत होतो. अचानक मला   अक्षयाने फोन केला. तू मेसेज वाचला का? फोटो बघितलास का? असं तिने मला विचारलं. मी मॅसेज बघितला तर, त्यावर 1,2,3  आणि 27,28 अशा तारखा लिहिल्या होत्या. त्या साखरपुड्यासाठी काढलेल्या तारखा होत्या.  

Web Title: Hardeek Joshi mother and Akshaya Deodhar mother-in-law photo