Hardeek Joshi And Akshaya Deodhar : “मी तयार नव्हते...”, लग्नाला महिना पूर्ण झाला अन् पाठकबाईंनी केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 10:24 IST2023-01-03T10:24:27+5:302023-01-03T10:24:58+5:30

Hardeek Joshi And Akshaya Deodhar : अभिनेता हार्दिक जोशी व अभिनेत्री अक्षया देवधर या जोडप्याच्या लग्नाला महिना पूर्ण झाला. यानिमित्त पाठकबाईंनी अर्थात अक्षयाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अक्षयाने एक मोठा खुलासा केला आहे.

Hardeek Joshi And Akshaya Deodhar 1 Month wedding Anniversary share video | Hardeek Joshi And Akshaya Deodhar : “मी तयार नव्हते...”, लग्नाला महिना पूर्ण झाला अन् पाठकबाईंनी केला मोठा खुलासा

Hardeek Joshi And Akshaya Deodhar : “मी तयार नव्हते...”, लग्नाला महिना पूर्ण झाला अन् पाठकबाईंनी केला मोठा खुलासा

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला राणादा आणि त्याची पाठकबाई यांचा लग्नसोहळा धुमधडाक्यात पार पडला. आम्ही बोलतोय ते अभिनेता हार्दिक जोशी ( Hardeek Joshi) व अभिनेत्री अक्षया देवधर  (Akshaya Deodhar) यांच्याबद्दल. बघता बघता काल 2 जानेवारीला या जोडप्याच्या लग्नाला महिना पूर्ण झाला. यानिमित्त पाठकबाईंनी अर्थात अक्षयाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ कमालीचा गोड आहे. याच व्हिडीओत अक्षयाने एक मोठा खुलासाही केला आहे.

होय, व्हिडीओ अक्षया व हार्दिक दोघांचा आहे. दोघंही लग्नाआधीच्या लव्हस्टोरीवर बोलत आहेत. लग्नासाठी विचारल्यावर होकार देण्यासाठी अक्षयाने सहा महिन्यांचा वेळ घेतला होता. यामागचं कारण अक्षयाने सांगितलं.

ती व्हिडीओत म्हणते, ‘तो मला विचारणार खरं तर याची थोडी कल्पना आधीच आली होती. काय घडतंय किंवा समोरचा काय बोलणार, याचा अंदाज येतोच. त्यामुळे फार काही अनपेक्षित नव्हतं. त्याला काय वाटतंय, हे मला कळलं होतं. पण हो, हार्दिक थेट लग्नाचं विचारणार, असं वाटलं नव्हतं. आधी मी तयार नव्हते. त्यामुळे मला उत्तर द्यायला थोडा वेळ लागला. पण मलाही माहित होतं की मी होच म्हणणार आहे. त्यामुळे सगळं कसं व्यवस्थित पार पडलं.’

हार्दिक म्हणाला....
‘तुझ्यात जीव रंगला’  मालिका संपल्यानंतर लग्नाचं वय झालं आहे, असं मला घरुन सांगण्यात आलं. अक्षयाला लग्नासाठी विचार, असं आई म्हणाली. त्यामुळे आमच्या लग्नाचं क्रेडिट माझ्या आईला जातं. मी प्रपोज केल्यानंतर अक्षयाने लगेच उत्तर दिलं नाही. तिने सहा महिन्यांचा वेळ घेतला. मालिका संपल्यानंतर आमचा एकमेकांमध्ये जीव रंगला..., असं हार्दिक म्हणतो. यावेळी हार्दिक अक्षयाला ‘मेरे सपनों की रानी’ हे गाणं समर्पित केलं.

व्हिडीओत हार्दिक व अक्षयाच्या लग्नाचे खास क्षण पाहायला मिळतात. लग्नातील धम्माल, दोघांचे एकमेकांत हरवल्याचे क्षण आणि सोबतीला ‘वेड तुझा विरह हळवा’ हे गाणं... एकंदर हा व्हिडीओ पाहणं एक सुंदर अनुभव आहे.
 

Web Title: Hardeek Joshi And Akshaya Deodhar 1 Month wedding Anniversary share video