'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम देवकी उर्फ मिनाक्षी राठोडची लेक झाली १ वर्षाची, शेअर केली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 19:47 IST2023-05-10T19:47:08+5:302023-05-10T19:47:40+5:30

Meenakshi Rathod : मिनाक्षी राठोडने याराच्या वाढदिवसानिमित्त स्पेशल फोटोशूट केले असून तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

'Happiness is exactly what it is' fame Devaki aka Meenakshi Rathod turns 1 year old, shares a special post | 'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम देवकी उर्फ मिनाक्षी राठोडची लेक झाली १ वर्षाची, शेअर केली खास पोस्ट

'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम देवकी उर्फ मिनाक्षी राठोडची लेक झाली १ वर्षाची, शेअर केली खास पोस्ट

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asata) मालिका सतत चर्चेत येत असते. या मालिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळताना दिसते आहे. तसेच या मालिकेतील सर्व पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. या मालिकेत देवकीच्या भूमिकेतून मीनाक्षी राठोड (Meenakshi Rathod) घराघरात पोहचली. मात्र सध्या या मालिकेत तिच्या जागी अभिनेत्री भक्ती रत्नपारखी पाहायला मिळत आहे. मीनाक्षी राठोडने प्रेग्नेंसीमुळे ही मालिका सोडली होती. तिने एका मुलीला जन्म दिला. तिचं नाव यारा आहे. यारा आता एक वर्षांची झाली असून तिच्या वाढदिवसानिमित्त फोटो शेअर करत स्पेशल पोस्ट शेअर केली आहे.

मिनाक्षी राठोडने याराच्या वाढदिवसानिमित्त स्पेशल फोटोशूट केले असून तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने फोटो शेअर करत लिहिले की, हॅप्पी वन. माय लिटिल वन. खरेतर वाढदिवशी असं सोशल मीडियावर शुभेच्छा देणं खूप typical आहे. पण काय करणार आपला आनंद सगळ्यांसोबत शेअर करण्याची हीच एक सोयीस्कर जागा आहे. तर आज यारा आणि आमच्या सोबतीला एक वर्ष पूर्ण झालं! आम्हाला समृद्ध करणारा हा प्रवास तुझ्या रूपानं बहरत जावा! ❤️


याराच्या या फोटोशूटमध्ये तिने खूप हटके पोझ दिल्या आहेत. या फोटोशूटमध्ये खूपच गोड दिसते आहे. तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील कलाकारांनीदेखील या पोस्टवर शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: 'Happiness is exactly what it is' fame Devaki aka Meenakshi Rathod turns 1 year old, shares a special post