भारती सिंगला पतीकडून सरप्राईज, वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 15:52 IST2019-07-03T15:48:39+5:302019-07-03T15:52:28+5:30

वाढदिवसानिमित्त भारतीला पती हर्षकडून खास गिफ्टसुद्धा मिळालं आहे.

Haarsh Limbachiyaa throws a surprise birthday party for Bharti Singh on the sets of Khatra Khatra Khatra | भारती सिंगला पतीकडून सरप्राईज, वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन

भारती सिंगला पतीकडून सरप्राईज, वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन

कॉमेडीयन भारती सिंगचा प्रत्येक अंदाज रसिकांना भावला. नुकतंच कॉमेडी क्वीन भारतीचा  वाढदिवस झाला. मोठ्या उत्साहात रसिकांनीही भारतीचा वाढदिवस साजरा केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून रसिकांनी भारतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

 

 

तिच्या घरीही तिचा वाढदिवस दणक्यात सेलिब्रेट करण्यात आला. यावेळी तिचा पती हर्ष लिंबाचीया आणि कुटुंबाने तिच्यासाठी खास सरप्राईज पार्टी ठेवली होती. 


तसेच सेटवरही तिचा बर्थ डे सेलिब्रेट करण्यात आला दरम्यान आपल्या खास मैत्रिणीला शुभेच्छा देण्यासाठी यावेळी मित्र मैत्रीणींनीही आवर्जून उपस्थित लावली होती. भारतीच्या या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो  हर्षने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 

वाढदिवसानिमित्त भारतीला पती हर्षकडून खास गिफ्टसुद्धा मिळालं आहे.  तसेच  या फोटोंमध्ये भारती आनंदी आणि उत्साही असल्याचे दिसून येत आहे. भारतीच्या या वाढदिवस सेलिब्रेशनच्या फोटोंवर रसिकांकडूनही लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Web Title: Haarsh Limbachiyaa throws a surprise birthday party for Bharti Singh on the sets of Khatra Khatra Khatra