लोकांना हसविणं हेच माझ्या जीवनाचं ध्येय- राजीव निगम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 10:20 AM2018-03-16T10:20:18+5:302018-03-16T15:50:18+5:30

प्रत्येक भागात नवे राजकीय विडंबन, भ्रष्ट नेत्यांवरील तिरकस शेरेबाजी आणि पुरेपूर करमणुकीमुळे ‘स्टार प्लस’वरील ‘हर शाख पे उल्लू बैठा ...

The goal of my life is to laugh at people - Rajiv Nigam | लोकांना हसविणं हेच माझ्या जीवनाचं ध्येय- राजीव निगम

लोकांना हसविणं हेच माझ्या जीवनाचं ध्येय- राजीव निगम

googlenewsNext
रत्येक भागात नवे राजकीय विडंबन, भ्रष्ट नेत्यांवरील तिरकस शेरेबाजी आणि पुरेपूर करमणुकीमुळे ‘स्टार प्लस’वरील ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होत चालली आहे. नेहमीच्या सासू-सुनेच्या रटाळ कथांनी भरलेल्या मालिकांच्या विश्वात या मालिकेने आपल्या नावीन्यपूर्ण विषयामुळे ताज्या हवेची झुळूक आणली आहे.लोकांच्या सेवेपेक्षा आपले खिसे भरणे हेच ज्याचे सत्तासंपादण्यामागील ध्येय आहे, अशा चैतूलाल या भ्रष्ट राजकीय नेत्याची भूमिका या मालिकेत राजीव निगम साकारीत आहेत. गेली अनेक वर्षे विनोदी लेखन आणि स्टॅण्ड-अप कॉमेडियनचे काम केलेल्या राजीव निगम यांनी आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित केले आहे. ते सांगतात,“मी विनोदवीर बनण्यासाठीच मुंबईत आलो आणि माझ्या सुदैवाने मला तशी संधी मिळालीही. आज लोक मला विनोदी लेखक आणि कॉमेडियन म्हणून ओळखतात.माझ्या निश्चित अशा भावी योजना नाहीत, पण जोवर जिवंत आहे, तोपर्यंत मी लोकांना हसवीत राहीन, एवढे निश्चित.”या मालिकेद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हे राजीव निगम यांचे ध्येय असून आजवर प्रेक्षकांनी आपल्याला जसा पाठिंबा आणि प्रेम दिले तसेच ते यापुढेही देत राहतील, अशी त्यांची अपेक्षा आहे.

टीव्हीवरील राजकीय विडंबनाची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत वाढली असून त्यामुळे आपल्याच चुकांवर हसण्याची संधी प्रेक्षकांना मिळत आहे.‘हर शाख पे उल्लू बैठा है’ ही आगामी मालिका देशातील विद्यमान राजकीय स्थितीवर तिरकस भाष्य सादर करणार आहे.राजकीय विडंबनाचा प्रदीर्घ अनुभव असलेले आणि ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’या कार्यक्रमातील एक लोकप्रिय उमेदवार राजीव निगम हे या मालिकेत चैतूलाल या भ्रष्ट आणि विनोदी राजकीय नेत्याची भूमिका रंगविणार आहेत.टीव्हीवर राजकीय नेत्याची भूमिका रंगविण्यास उत्सुक झालेले राजीव निगम म्हणाले, “एक नेता म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांचा मी नेहमीच आदर करतो. राजकीय उपहास हे माझं कार्यक्षेत्र असल्याने मला वाजपेयी यांच्याकडून नेहमीच प्रेरणा मिळत आली आहे. मी त्यांची भाषणं नेहमीच ऐकत आलो असून त्यांची नक्कल करण्याचाही प्रयत्न केला आहे.त्यांची पंतप्रधानपदाची कारकीर्द प्रशंसनीय असून त्यांनी भारताला स्वसंरक्षणार्थ अण्वस्त्र बाळगण्याचं समर्थन केलं होतं.तसंच आर्थिक आणि परराष्ट्र धोरणात त्यांनी अनेक सुधारणा केल्या.आश्वासनं देऊन आपल्या कार्यकाळातच ती प्रत्यक्षात उतरविणार्‍या मोजक्या नेत्यांमध्ये वाजपेयी यांचा समावेश होतो.”प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यावर राजीव निगम यांचा भर असून त्यासाठी राजकीय उपहास हे माध्यम त्यांनी निवडले आहे.या भ्रष्ट नेत्यांच्या दृष्टीने आपले खिसे भरणं हे सर्वात प्राधान्याचं काम असून देशाचं हित हे सर्वात शेवटी येतं.

Web Title: The goal of my life is to laugh at people - Rajiv Nigam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.