गिरीजा प्रभूने सादर केली चक्क एमजे स्टाईल लावणी, एकदा पहाच !!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 12:10 PM2019-12-28T12:10:40+5:302019-12-28T12:13:18+5:30

गिरीजा मंचावर अवतरली आणि तिने आपल्या नृत्याविष्काराने सगळ्यांनाच चकित केले.

Girija Prabhu MJ Style Lavani Dance, Take a Look !!! | गिरीजा प्रभूने सादर केली चक्क एमजे स्टाईल लावणी, एकदा पहाच !!!

गिरीजा प्रभूने सादर केली चक्क एमजे स्टाईल लावणी, एकदा पहाच !!!

googlenewsNext

अद्वैत दादरकरच्या खुमासदार सूत्रसंचालनामुळे रंगणारी 'युवा डान्सिंग क्वीन' ही स्पर्धा सध्या छोट्या पडद्यावर सुरू आहे. सगळेच स्पर्धक आपला अत्यंत जबरदस्त परफॉर्मन्स देत असल्यामुळे, परीक्षक सोनाली कुलकर्णी आणि मयूर वैद्य यांना परीक्षण करणे सुद्धा अवघड जात आहे. प्रेक्षकांसाठी नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी 'झी युवा' वाहिनी घेऊन येत असते. ही स्पर्धा सुद्धा याला अपवाद नाही. याचा प्रत्यय प्रेक्षकांना नुकताच आलेला आहे. गिरीजा प्रभू हिने, आपल्या सादरीकरणात, लावणीला चक्क एमजे म्हणजेच मायकल जॅकसन याचा टच देण्याचा प्रयत्न केला.


विविध मालिकांमधून छोट्या पडद्यावर झळकलेली पुण्याची गिरीजा ही एक अत्यंत तगडी स्पर्धक आहे. आपल्या दर्जेदार नृत्य सादरीकरणाच्या जोरावर, तिने सर्वच स्पर्धकांसमोर मोठे आव्हान उभे केलेले आहे. अभिनयकला सुद्धा अंगी जोपासणाऱ्या गिरीजाला नृत्याबद्दल असलेली विशेष आवड तिच्या परफॉर्मन्स मधून दिसून येते. तिने सादर केलेल्या लावणीचा अंदाज फारच निराळा होता. एका बाजूला नऊवारी तर दुसऱ्या बाजूला मायकल जॅकसनचा खास पेहराव अशा वेशात गिरीजा मंचावर अवतरली आणि तिने आपल्या नृत्याविष्काराने सगळ्यांनाच चकित केले. ठसकेबाज लावणी आणि 'एमजे'चा मूनवॉक यांचा मिलाफ असलेला हा धमाकेदार परफॉर्मन्स तिने सादर केला. 


परीक्षक सुद्धा तिच्यावर खूप खुश झालेले पाहायला मिळाले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, सादर करायला खूप कठीण असलेला हा डान्स मंचावर करून दाखवत, तिने इतर स्पर्धकांसमोर मोठी स्पर्धा उभी केलेली आहे. 'युवा डान्सिंग क्वीन' ही स्पर्धा आता स्पर्धकांसह परिक्षकांसाठी सुद्धा अधिकाधिक कठीण होत चाललेली आहे.

Web Title: Girija Prabhu MJ Style Lavani Dance, Take a Look !!!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.