गिरिजा ओकने 'लेडीज स्पेशल'च्या टीमला दिली ही ट्रीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2018 21:00 IST2018-11-09T21:00:00+5:302018-11-09T21:00:02+5:30

लोकांच्या हृदयापर्यंत जाण्याचा मार्ग त्यांच्या पोटातून जातो असे म्हटले जाते. गिरीजा ओकला ही गोष्ट चांगलीच माहीत आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

Girija Okane gave a treat to Ladies Special team | गिरिजा ओकने 'लेडीज स्पेशल'च्या टीमला दिली ही ट्रीट

गिरिजा ओकने 'लेडीज स्पेशल'च्या टीमला दिली ही ट्रीट

ठळक मुद्देलेडीज स्पेशल या मालिकेत गिरिजा मेघना निखाडे नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे.तिने कार्यक्रमाच्या सर्व कलाकार आणि क्रूला नुकतीच 'लेमन केक'ची मेजवानी द्यायचं ठरवलं.तिने हा लेमन केक पुण्यातील एका प्रसिद्ध बेकरीतून मागवला होता.

गेली अनेक वर्षे चित्रपट आणि टेलिव्हिजन मालिकांमधून केलेल्या विविध भूमिकांद्वारे गिरिजा ओकने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. नुकतीच ती स्पर्श वात्सल्याचा या कार्यक्रमात दिसली होती. यानंतर आता ती प्रेक्षकांना लेडीज स्पशेल या मालिकेत एका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेसाठी गिरिजाने चित्रीकरण देखील करायला सुरुवात केली आहे.

लेडीज स्पेशल या मालिकेत गिरिजा मेघना निखाडे नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. मेघना एका सामान्य पार्श्वभूमीतून आलेली असली तरी यशस्वी उद्योजिका होण्याचे तिचे स्वप्न आहे. या मालिकेतील तिच्या या व्यक्तिरेखेवर सध्या गिरिजा चांगलीच मेहनत घेत आहे.

लोकांच्या हृदयापर्यंत जाण्याचा मार्ग त्यांच्या पोटातून जातो असे म्हटले जाते. गिरीजा ओकला ही गोष्ट चांगलीच माहीत आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. तिच्या लेडीज स्पेशल या मालिकेच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून तिच्या सहकलाकारांसोबत तिची चांगलीच गट्टी जमली आहे. तिने कार्यक्रमाच्या सर्व कलाकार आणि क्रूला नुकतीच 'लेमन केक'ची मेजवानी द्यायचं ठरवलं. तिने हा लेमन केक पुण्यातील एका प्रसिद्ध बेकरीतून मागवला होता. याविषयी गिरिजाला विचारले असता ती सांगते, "लेडीज स्पेशल या मालिकेची सगळीच टीम खूपच छान आहे. अशा मस्त कलाकार आणि क्रूबरोबर काम करायला मला खूप मजा येत आहे. या मालिकेच्या सेटवर प्रत्येक जण कष्ट करतो आणि इतरांच्या कामाचं कौतुकही करतो. त्यांना बरं वाटावं म्हणून मी श्रुजबेरी बिस्किटांसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्याच्या एका बेकरीतून प्रत्येकासाठी 'लेमन केक' आणले."

कलाकार कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्या टीमला भव्य पार्ट्या देतात. तसेच भव्य इव्हेंट्स आयोजित करतात. पण गिरिजाने एक वेगळेच गिफ्ट द्यायचे ठरवले. गिरिजाच्या या 'लेमन केक'च्या आंबटगोडपणामध्ये नक्कीच काहीतरी प्रेमळ भाव आहे ज्यामुळे तिला सहकलाकारांकडून 'ब्राउनी पॉईंट्स' मिळाले यात काहीच शंका नाही.         

'लेडीज स्पेशल' ही मालिका लवकरच सोनी एंटरटेनमेन्ट टेलिव्हिजनवर सुरू होणार आहे.

Web Title: Girija Okane gave a treat to Ladies Special team