'गुलाम' मालिकेत रिध्दीमा तिवारी विद्या बालनसह झळकणार 'बेगम जान' सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2017 12:06 IST2017-03-09T06:36:53+5:302017-03-09T12:06:53+5:30

विद्या बालन या अभिनेत्रीसह काम करायाला मिळण्याची प्रत्येक कलाकराची इच्छा असते. नुकतेच  विद्या बालनचा  'बेगम जान' सिनेमाचे पोस्टर लॉन्च ...

In 'Ghulam' series, 'Begum Jan' will be seen with Riddima Tiwari Vidya Balan in the film | 'गुलाम' मालिकेत रिध्दीमा तिवारी विद्या बालनसह झळकणार 'बेगम जान' सिनेमात

'गुलाम' मालिकेत रिध्दीमा तिवारी विद्या बालनसह झळकणार 'बेगम जान' सिनेमात

द्या बालन या अभिनेत्रीसह काम करायाला मिळण्याची प्रत्येक कलाकराची इच्छा असते. नुकतेच  विद्या बालनचा  'बेगम जान' सिनेमाचे पोस्टर लॉन्च करण्यात आले आहे. बेगम जान सिनेमात विद्या बालनचा लुक अतिशय वेगळा दिसत असून हे पोस्टर सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेतंय.हा सिनेमा 'राजकहानी’ या बंगाली सिनेमाचा हिंदी रिमेक असून या सिनेमाच्या बंगाली व्हर्जनमध्ये रितुपर्णा सेनगुप्ता झळकली होती. आता हिंदी रिमेकमध्ये ही भूमिका विद्या साकारताना दिसणार आहे.मात्र विद्यापेक्षा एक टीव्ही अभिनेत्री सध्या खूप खुश आहे.जिथे जावे तिथे तीच या सिनेमाचे जास्त प्रमोशन करताना दिसतेय. आता या टीव्ही अभिनेत्रीचे विद्याबालनशी नेमके काय कनेक्शन आहे. असे तुम्हाला वाटणे स्वाभाविक आहे.कारण 'गुलाम' मालिकेत माल्दावाली ही भूमिका साकारणारी रिद्धीमा तिवारीने विद्या बालनसह बेगम जान सिनेमात एकत्र काम केले आहे. त्यामुळे आज मै ऊपर आसमां निचे अशी गत काहीशी रिध्दीमाची झालेली दिसतेय. त्यामुळे ती मालिकेतही विद्याबालन सारखेच कॅरेटक्टर करण्यात तिचा कल असतो. तिने या मालिकेत  'द डर्टी पिक्चर’ या सिनेमात विद्या बालनने साकारलेली भूमिका ही तिने आजवर केलेल्या सर्वात उत्कृष्ट भूमिकांपैकी एक असल्याचे रिध्दीमाला वाटते त्यामुळे विद्यासारखीच देहबोली शिकण्यसाठी 'डर्टी' सिनेमा अमेकवेळा पाहिला असल्याचे रिध्दीमा सांगते.त्यामुळे मालिका असो किंवा सिनेमा अभिनय क्षेत्रात पदार्पणापासूनच विद्या बालन तिची प्रेरणास्थान राहिली असल्याचे रिध्दीमा सांगते. 

Web Title: In 'Ghulam' series, 'Begum Jan' will be seen with Riddima Tiwari Vidya Balan in the film