घो मला असला हवा! गौतमी पाटीलला कसा पाहिजे जोडीदार? स्वत:च खुलासा करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 15:41 IST2025-12-29T15:39:39+5:302025-12-29T15:41:43+5:30
गौतमी पाटीलला हवाय 'असा' जोडीदार, अपेक्षा सांगत म्हणाली-"माझ्यासोबत ज्या गोष्टी घडल्या त्या स्विकारणारा..."

घो मला असला हवा! गौतमी पाटीलला कसा पाहिजे जोडीदार? स्वत:च खुलासा करत म्हणाली...
Gautami Patil: महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलची चाहत्यांमध्ये कमालीची क्रेझ आहे. तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला लोकांची तुफान गर्दी असते. गौतमीच्या आयुष्यातील खाजगी गोष्टी जाणून घेण्यास तिच्या चाहत्यांना प्रचंड रस असतो. अनेकदा गौतमीला तिच्या सोशल मीडियासह सर्वत्र तिच्या लग्नाबद्दल विचारलं जातं. त्यात आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं लग्न आणि होणाऱ्या नवऱ्याबद्दल अपेक्षा सांगितल्या आहेत.
लाखो तरुणांच्या हृदयाची धडधड वाढवणाऱ्या गौतमी पाटीलने नुकतीच 'इट्स मज्जा'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये गौतमी म्हणाली,"मला सारखं लग्नाबद्दल विचारलं जातं. सध्यातरी माझ्या डोक्यात लग्नाचा विचार नाही. आता पुढे काय होईल वगैरे याचा मी कधीच विचार केला नाही. पण, आपल्या घरी जसं चालू असतं की,'लग्न कर वगैरे...', माझ्या घरीही अशीच परिस्थिती आहे. माझ्या आईचं बाकी काहीच नसतं पण ती माझ्या लग्नाबद्दल कायम बोलत असते.तू लग्न कर असं ती नेहमीच बोलत राहते. "
गौतमीला हवाय असा जोडीदार...
त्यानंतर पुढे गौतमी नवऱ्याबद्दल अपेक्षा सांगताना म्हणाली, "कोणतीही मुलगी असेल तरी तिच्या डोक्यात हाच विचार असतो की आपला जोडीदार हा आपल्याला समजून घेणारा पाहिजे. शिवाय मी ज्या क्षेत्रात आहे याचा त्या मुलाने स्वीकार केला पाहिजे.माझ्यासोबत बऱ्याच गोष्टी घडल्यात आणि मी माझ्या आईला सोडून राहू शकत नाही. माझ्यासोबत माझी आई सुद्धा असणार आहे. या मुलाखतीत लग्नाचा प्रस्ताव आलाय का असं विचारण्यात आलं त्याबद्दल बोलताना ती म्हणाली, माझ्या आईने तर अक्षरश:बायोडेटा बनवलाय.तिने मामाला फोन केला आणि सांगितलं, आता आपलं ऐकत नाहीतर आपणच सगळं करू. असं सगळे प्रकार माझ्या घरातही घडतात. फक्त बाहेरून नाही घरातही मला लग्नाबद्दल बोललं जातं. "असा खुलासा गौतमीने मुलाखतीत केला.