मोदक आणि पुरणपोळी शिकण्याच्या वयात..'; गौतमी देशपांडे स्वयंपाकाच्या व्हिडीओमुळे झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 01:56 PM2022-02-14T13:56:18+5:302022-02-14T19:03:53+5:30

स्वयंपाक बनवतानाचा एक व्हिडीओ गौतमीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.

Gautami Deshpande share her cooking video, get troll on social media | मोदक आणि पुरणपोळी शिकण्याच्या वयात..'; गौतमी देशपांडे स्वयंपाकाच्या व्हिडीओमुळे झाली ट्रोल

मोदक आणि पुरणपोळी शिकण्याच्या वयात..'; गौतमी देशपांडे स्वयंपाकाच्या व्हिडीओमुळे झाली ट्रोल

googlenewsNext

'माझा होशील ना' (Majha Hoshil Na) या मालिकेत सईची भूमिका साकारत अभिनेत्री गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) घराघरात पोहचली. गौतमी ही सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. गौतमी नेहमीच नवनवीन गोष्ट करण्याचा प्रयत्न करत असते. नुकताच गौतमीने स्वयंपाक बनवलाय. स्वयंपाक बनवण्याचा कदाचित गौतमीचा हा पहिलाच प्रयत्न असावा.स्वयंपाक बनवतानाचा एक व्हिडीओ गौतमीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये When I try to cook असं कॅप्शन दिलयं. मात्र तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत तिला ट्रोल  केलं आहे. एका चाहत्याने कमेट करत, आता वरण भातच शिकतेय, मोदक आणि पुरणपोळी शिकण्याच्या वयात असं म्हंटलयं. तर हे मस्त आहे यार स्वतःच बनवलं स्वतःच टेस्ट केलं, वरण भाताचं कौतुक... काहीही हा श्री, प्रयत्न करा नक्की जमेल अशा कमेंट्स करत तिला ट्रोल करण्यात आलयं. तर काहींनी मात्र तिच्या स्वयंपाकाचं कौतुकही केलंय. मुलगी शिकली प्रगती झाली, डाल फ्राय लसुन मारके, किचन कल्लाकारचा परिणाम, मला वाटतं तू एक चांगली शेफ आहेस, आम्ही सारे खवय्येचे नवीन सूत्रधार, कोणा स्पेशल व्यक्तीसाठी स्वयंपाक करतेयस का? अशाही कमेंट्स तिच्या या व्हिडीओवर येताना दिसून येत आहेत.

गौतमी ही सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसून येते. गौतमी ही अभिनेत्रीसोबतच एक गायिका देखील असून आपल्या सुंदर फोटोंसोबतच ती आपल्या गाण्याचे अनेक व्हिडीओ ही सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे हे गाण्याचे व्हिडीओज चाहत्यांना खूपच पसंतीस पडत असतात. 

Web Title: Gautami Deshpande share her cooking video, get troll on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.