ही चिमुकली प्रसिद्ध मालिकेत साकारतेय मुख्य भूमिका, ओळखा पाहू कोण आहे ही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 06:00 IST2021-05-26T06:00:00+5:302021-05-26T06:00:02+5:30

या अभिनेत्रीने छोट्या पडद्यावर पदार्पण करून खूपच कमी वेळ झाला असला तरी तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.

gautami deshpande childhood picture | ही चिमुकली प्रसिद्ध मालिकेत साकारतेय मुख्य भूमिका, ओळखा पाहू कोण आहे ही?

ही चिमुकली प्रसिद्ध मालिकेत साकारतेय मुख्य भूमिका, ओळखा पाहू कोण आहे ही?

ठळक मुद्देमाझा होशील ना... या मालिकेत गौतमी साकारत असलेली सईची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे.

झी मराठीवरील ”माझा होशील ना” या मालिकेतून गौतमी देशपांडे घराघरात पोहोचली. गौतमी देशपांडे सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून ती सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. तिचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला असून या फोटोत आपल्याला चिमुकली गौतमी पाहायला मिळत आहे. गौतमी लहानपणी देखील तितकीच गोंडस दिसायची असे तिचे चाहते तिला सध्या सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत.

माझा होशील ना... या मालिकेत गौतमी साकारत असलेली सईची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत गौतमीने सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले. या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते.

माझा होशील ना या मालिकेत विराजस कुलकर्णी या तिच्या लहानपणीच्या मित्रासोबतच पडद्यावर नायिका साकारण्याची संधी मिळाल्याने या दोघांची केमिस्ट्री चांगलीच जुळून आली आहे. गौतमीने कमी वेळात छोट्या पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे. या शिवाय ती एक उत्तम गायिका आहे. अनेक वेळा ती गाण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. गौतमीला गाण्याचा वारसा तिच्या आजीकडून मिळाला आहे.

Web Title: gautami deshpande childhood picture