'सुख म्हणजे नक्की काय असतं' उत्कंठावर्धक वळणावर, कबड्डीच्या सामन्यासाठी जयदीपसोबत गौरीही झाली सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 12:47 IST2021-11-10T12:47:35+5:302021-11-10T12:47:58+5:30

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेचे कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचले आहे.

Gauri ready for Kabaddi match with Jaideep in Sukh Mhanje Nakki Kay Asate | 'सुख म्हणजे नक्की काय असतं' उत्कंठावर्धक वळणावर, कबड्डीच्या सामन्यासाठी जयदीपसोबत गौरीही झाली सज्ज

'सुख म्हणजे नक्की काय असतं' उत्कंठावर्धक वळणावर, कबड्डीच्या सामन्यासाठी जयदीपसोबत गौरीही झाली सज्ज

स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेचे कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचले आहे. गमावलेली प्रॉपर्टी पुन्हा मिळवायची असेल तर शिर्केपाटील कुटुंबासमोर सध्या एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे शालिनीविरुद्ध कबड्डीचा सामना जिंकणे. यासाठी संपूर्ण कुटुंबाने एकत्र येत मेहनत घेतली आहे. दरम्यान आता या सामन्यात नवीन ट्विस्ट येताना दिसणार आहे. हा ट्विस्ट म्हणजे जयदीपसोबत गौरीदेखील कबड्डीचा सामना खेळताना दिसणार आहे.  

भैरु कोचच्या मार्गदर्शनाखाली जोरदार सराव करत आता अंतिम सामन्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. कबड्डीच्या संघात किमान सात खेळाडू असणे बंधनकारक असते. त्यामुळे ऐन मोक्याच्या क्षणी गौरीने मैदानात एण्ट्री घेत कबड्डीच्या सामन्यात नवा ट्विस्ट आणला आहे. त्यामुळे हा सामना उत्कंठावर्धक असणार यात शंका नाही.

गौरी जयदीप विरुद्ध शालिनीचा संघ असा रंगणार चुरशीचा सामना

या सामन्याच्या निमित्ताने गौरीचे नवीन रुप पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तिच्यातला आत्मविश्वास, जिद्द आणि चिकाटी शिर्केपाटील कुटुंबाला त्यांचे समृद्ध दिवस पुन्हा मिळवून देईल याची खात्रीही आहे. त्यामुळे गौरी जयदीप विरुद्ध शालिनीचा संघ असा हा चुरशीचा सामना  रविवार १४ नोव्हेंबरला दुपारी १ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता २ तासाच्या महाएपिसोडमध्ये फक्त स्टार प्रवाहवर पहायला मिळणार आहे.

Web Title: Gauri ready for Kabaddi match with Jaideep in Sukh Mhanje Nakki Kay Asate