गौरव वाधवाला आयुष्यात हवी करीना कपूरसारखी मुलगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 18:06 IST2018-08-08T18:05:20+5:302018-08-08T18:06:25+5:30

छोट्या पडद्यावरील अभिनेता गौरव वाधवा अश्मित ओबरॉय नावाच्या एका तरुण व्यावसायिक टायकूनची व्यक्तिरेखा साकारतो आहे.

Gaurav Vadhwala wants life partner like Kareena Kapoor | गौरव वाधवाला आयुष्यात हवी करीना कपूरसारखी मुलगी

गौरव वाधवाला आयुष्यात हवी करीना कपूरसारखी मुलगी

ठळक मुद्देगौरवचे करिनावर क्रश

स्टार प्लस वाहिनीवर 'सुपर सिस्टर्स' ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत छोट्या पडद्यावरील अभिनेता गौरव वाधवा अश्मित ओबरॉय नावाच्या एका तरुण व्यावसायिक टायकूनची व्यक्तिरेखा साकारतो आहे. या भूमिकेसाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. त्याने आपल्याला आयुष्यात कुणासारखी प्रेमिका हवी आहे हे सांगताना त्याला शब्द तोकडे पडत आहेत. गौरव करीना कपूरचा मोठा चाहते आहे. त्याला आपली होणारी बायकोसुद्धा करीनासारखे व्यक्तिमत्त्व असणारी हवी आहे. 


याबाबत गौरव वाधवा म्हणाला की,' माझ्या आयुष्यात करीना कपूरसारखी मुलगी अाली तर जास्त आवडेल. माझे तिच्यावर फारच क्रश आहे. ती अतिशय सुंदर असण्याबरोबरच स्मार्ट आहे, धमाल आहे आणि आत्मविश्वासूसुद्धा आहे. ती अगदी अंतर्बाह्य सुरेख आहे.'
'सुपर सिस्टर्स' मालिका दोन बहिणींच्या नातेसंबंधावर आधारीत आहे आणि यात शिवानी व अश्मित यांची प्रेमकथाही पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील भूमिकेबाबत गौरवने सांगितले की, 'या मालिकेत मी अश्मित ओबेरॉय ही व्यक्तिरेखा साकारतोय. एनआरआर अश्मित छान मजेत जगणारा माणूस आहे. त्याला हिंदी बोलता येते, पण फारसे नाही. अवघड शब्द तर नाहीच. तो छान आहे दिसायलाही आणि मनानेही. तो छान फ्लर्टिंगही करतो. पण, त्यात असभ्यपणा नसतो आणि तो काही सतत फ्लर्टिंग करत फिरत नाही.'
'सुपर सिस्टर्स' या मालिकेची संकल्पना आगळीवेगळी आहे. ती मी पहिल्यांदा ऐकली तेव्हाच मला फार आवडली. यातली नायिका तिच्या काही गूढ रहस्यांमुळे सतत प्रेमापासून लांब राहत असते. या मालिकेचे कथातक जसजसे पुढे जाईल, हे आणखी उत्कंठा वाढवणारे ठरेल, असे गौरव वाधवा म्हणाला.

Web Title: Gaurav Vadhwala wants life partner like Kareena Kapoor