Gauahar Khan : गौहर खानने एअरपोर्टवर फ्लॉन्ट केला बेबी बम्प, चेहऱ्यावर आलाय प्रेग्नेंन्सीचा ग्लो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 15:46 IST2023-03-09T15:39:21+5:302023-03-09T15:46:29+5:30
गौहर खान सध्या आपली प्रेग्नेंन्सी एन्जॉय करतेय. गौहरचा एक लेटेस्ट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय यात ती बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसतेय.

Gauahar Khan : गौहर खानने एअरपोर्टवर फ्लॉन्ट केला बेबी बम्प, चेहऱ्यावर आलाय प्रेग्नेंन्सीचा ग्लो
गौहर खान सध्या आपली प्रेग्नेंन्सी एन्जॉय करतेय.लग्नाच्या दोन वर्षांनतर जैद दरबार (Zaid Darbar) आणि गौहर आई-बाबा होणार आहेत. मंगळवारी ती पती झैद दरबारसोबत विमानतळावर दिसली. जिथे दोघे एकमेकांचा हात धरलेले दिसले. गौहर खान कॅज्युअल लूकमध्ये तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसली. तर तिथे तिचा पती जैद तिची काळजी घेताना खूपच क्यूट दिसत होता. गौहर खानही कॅज्युअल लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
मंगळवारी गौहर एअरपोर्टवर बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसली. यादरम्यान तिचा पती जैद दरबार तिची खूप काळजी घेत होता. जैदने क्षणभरही गौहरचा हात सोडला नाही. गौहरने ब्लू कलरचा कॉर्ड परिधान केला होता. यासोबत तिने नो-मेकअप लूकमध्ये दिसली.
गौहर खान प्रेग्नेंसीदरम्यानही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. गौहर खान हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध नाव आहे. 'इशकजादे', 'रॉकेट सिंग', 'बेगम जान', 'तांडव', 'बेस्टसेलर', 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई', 'बद्रीनाथ की दुल्हनिया' यासह अनेक लोकप्रिय चित्रपट आणि वेब सिरीज आहेत. 'गेम' सारख्या चित्रपटात तिनं आपल्या दमदार अभिनयाची झलक दाखवली आहे. गौहर खानने छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यावर आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.