गौहर खानने सांगितलं काय ठेवलंय दुसऱ्या लेकाचं नाव; अर्थही आहे फारच खास, फोटोतून दाखवली चिमुकल्याची झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 13:35 IST2025-09-29T13:35:28+5:302025-09-29T13:35:48+5:30
गौहर खान दुसऱ्यांदा आई झाली आहे.तिला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. आता गौहरने तिच्या दुसऱ्या लेकाच्या नावाचाही खुलासा केला आहे. गौहरने पोस्ट शेअर करत तिच्या दुसऱ्या मुलाचं नावंही सांगितलं आहे.

गौहर खानने सांगितलं काय ठेवलंय दुसऱ्या लेकाचं नाव; अर्थही आहे फारच खास, फोटोतून दाखवली चिमुकल्याची झलक
'बिग बॉस' फेम बॉलिवूड अभिनेत्री गौहर खानने काही दिवसांपूर्वीच चाहत्यांना गुडन्यूज दिली. गौहर खान दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. गौहरला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. आता गौहरने तिच्या दुसऱ्या लेकाच्या नावाचाही खुलासा केला आहे. गौहरने पोस्ट शेअर करत तिच्या दुसऱ्या मुलाचं नावंही सांगितलं आहे.
गौहर खानने तिच्या इन्स्टाग्रामवरुन दोन्ही चिमुकल्यांचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत गौहरने दुसऱ्या मुलाचं नाव सांगितलं आहे. गौहरने तिच्या लेकाचं नाव 'फरवान' असं ठेवलं आहे. याचा अर्थ धनवान असा होतो. तिच्या मोठ्या मुलाचं नाव झेहान असं आहे. "झेहानचा छोटा भाऊ", असं कॅप्शन गौहर खानने या फोटोला दिलं आहे.
दरम्यान, डिसेंबर २०२० मध्ये गौहर खान आणि जैद यांनी लग्न केलं होतं. त्यानंतर २०२३ साली तिने त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला होता. त्यानंतर १ सप्टेंबर रोजी ती दुसऱ्यांदा आई झाली. गौहर खानने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत तिला पुत्ररत्न प्राप्ती झाल्याची माहिती दिली होती.