24 डिसेंबरला इस्माइल दरबार यांचा मुलगा जैदसोबत अडकणार लग्नाच्या बेडीत, 2 दिवस चालणार फंक्शन
By गीतांजली | Updated: November 3, 2020 15:27 IST2020-11-03T15:26:56+5:302020-11-03T15:27:02+5:30
गौहर आणि जैद दरबार 24 डिसेंबरला विवाहबंधनात अडकणार असल्याचे वृत्त आहे.

24 डिसेंबरला इस्माइल दरबार यांचा मुलगा जैदसोबत अडकणार लग्नाच्या बेडीत, 2 दिवस चालणार फंक्शन
अलीकडेच अशी बातमी आली होती की गौहर खान यावर्षी नोव्हेंबरमध्ये इस्माईल दरबार यांचा मुलगा जैद दरबारशी लग्न करणार आहे. पण जेव्हा गौहर खानला याबाबत विचारण्यात आले तेव्हा तिने साफ नकार दिला. पण आता गौहर आणि जैद दरबार 24 डिसेंबरला विवाहबंधनात अडकणार असल्याचे वृत्त आहे.
'स्पॉटबॉय'च्या रिपोर्टनुसार 24 डिसेंबरला लग्न करणार आणि सर्व फंक्शन्स मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये होणार आहेत. लग्नाचे फंक्शन्स दोन दिवस चालणार आहेत. 'बिग बॉस 14' च्या घरातून परतल्यानंतर गौहर खान झैद दरबारसह गोव्याला व्हॅकेशन एन्जॉय करायला गेले होते.रिपोर्टनुसार गोव्यात दोघे प्री-वेडिंग शूट करायला गेले आहेत.
इस्माईल दरबार यांनी दिला ग्रीन सिग्नल
असे म्हटले जाते की इस्माईल दरबार यांना आपला मुलगा जैद यांच्या निवडीवर काहीच आक्षेप नाही, परंतु त्यांनी आपल्या निर्णयाबद्दल काळजीपूर्वक विचार करण्याचा सल्ला आपल्या मुलाला दिला आहे. गौहर ही जैद पेक्षा मोठी आहे, याच गोष्टीमुळे वडिलांनी त्याला हा सल्ला दिला असावा. जैद हा अभिनेता, इफ्लूएंसर, कंटेट क्रिएटर आहे. सोशल मीडियावर त्याचे भरपूर फॉलोअर्स आहेत. तो एक प्रोफेशनल डान्सरही आहे