Gauahar Khan: वयाच्या ३९ व्या वर्षी आई होणार गौहर खान, गुडन्यूज शेअर करत म्हणाली- लवकरच आम्ही...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 11:26 AM2022-12-21T11:26:53+5:302022-12-21T11:30:06+5:30

टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खान लवकरच आई होणार आहे. एक क्यूट व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना तिनं ही खुशखबर दिली आहे.

Gauahar khan announce pregnancy as she expecting their first child share video on social media | Gauahar Khan: वयाच्या ३९ व्या वर्षी आई होणार गौहर खान, गुडन्यूज शेअर करत म्हणाली- लवकरच आम्ही...

Gauahar Khan: वयाच्या ३९ व्या वर्षी आई होणार गौहर खान, गुडन्यूज शेअर करत म्हणाली- लवकरच आम्ही...

googlenewsNext

टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खान लवकरच आई होणार आहे. अभिनेत्रीने एक क्यूट व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे. व्हिडिओमध्ये गौहर आणि तिचा पती जैद दरबार कार्टूनच्या रूपात दिसत आहेत. अभिनेत्रीची गुडन्यूज शेअर करण्याचा अंदाजही चाहत्यांना आवडला आहे. चाहत्यांनी अभिनेत्रीवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. 

गौहर खानने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करताना लिहिले, 'तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे.' व्हिडिओमध्ये गौहर आणि जैद दोघेही कार्टूनिश फॉर्ममध्ये बाइक चालवत आहेत. आपण लवकरच तीन होणार आहेत.  बाईकसोबत सीट जोडली आहे, ज्यावर टेडी बेअर बसलेला दिसतो. गौहरने हा व्हिडिओ शेअर केल्यापासून चाहते आणि मित्र तिचे अभिनंदन करत आहेत.

गौहर आणि जैदची लव्हस्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. लॉकडाऊन दरम्यान घरातील ग्रॉसरी खरेदी करताना दोघे एका दुकानात भेटले होते. गौहरने जैदला स्टोअरमध्ये पाहिले नाही. यानंतर जैदने गौहरला इन्स्टाग्रामवर मेसेज केला आणि दोघेही बोलू लागले. हळूहळू मैत्री झाली आणि तिचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर दोघांनी डिसेंबर 2020 मध्ये लग्न केले.आता लग्नाच्या दोन वर्षानंतर दोघेही लवकरच आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत.


गौहर खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिने छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यावर आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. याशिवाय ती ओटीटीवरील अनेक शोमध्येही दिसली आहे. 'इशकजादे'मधील गौहरची 'छोकरा जवान रे' आणि 'झल्ला-वल्ला' ही गाणी सुपरहिट ठरली होती. अलीकडेच ती नेहा कक्करच्या 'बारिश में तुम' या गाण्यात पती जैदसोबत दिसली होती.
 

Web Title: Gauahar khan announce pregnancy as she expecting their first child share video on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.