​गंगा या मालिकेत गंगाच्या आयुष्याला मिळणार वळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 16:31 IST2017-01-12T16:31:59+5:302017-01-12T16:31:59+5:30

गंगा या मालिकेत नुकतीच एक एंट्री झाली आहे. या मालिकेत शक्ती आनंद आता शिव या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार ...

Ganga will get the life of Ganges in the series | ​गंगा या मालिकेत गंगाच्या आयुष्याला मिळणार वळण

​गंगा या मालिकेत गंगाच्या आयुष्याला मिळणार वळण

गा या मालिकेत नुकतीच एक एंट्री झाली आहे. या मालिकेत शक्ती आनंद आता शिव या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. शक्तीने आतापर्यंत क्योंकी साँस भी कभी बहू थी, सारा आकाश, भारत का वीर पूत्र महाराणा प्रताप यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. 
गंगा या मालिकेत आता गंगा सागरला कायमचे सोडून शिवसोबत लग्न करणार आहे. शिव हा विदुर असून त्याला सहा वर्षांची मुलगी आहे. त्याच्यासाठी त्याची मुलगी हेच त्याचे संपूर्ण जग आहे. पण नियतीमुळे शिव आणि गंगा एकत्र येणार आहेत. पण शिव आपल्या दिवंगत पत्नीवर प्रचंड प्रेम करत असल्याने तो तिच्याशिवाय दुसऱ्या कोणत्याच स्त्रीला स्वीकारू शकत नाही. त्यामुळे गंगा आणि शिवच्या आय़ुष्यात आता पुढे काय होणार हे पाहाणे इंटरेस्टिंग ठरणार आहे. या मालिकेविषयी शक्ती सांगतो, "मी या मालिकेत साकारत असलेला शिव हा खूप वेगळा आहे. तो अतिशय स्पष्टवक्ता आहे. त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला असला तरी तो आजही तिच्यावर प्रचंड प्रेम करत होता. त्यामुळे तो गंगाला पत्नीचा दर्जा देणे खूपच कठीण आहे. गंगाच्या आयुष्यात आलेल्या संकटावर ती कशी मात करते आणि शिवचा विश्वास कसा संपादित करते हे प्रेक्षकांना पुढील भागांमध्ये कळलेच." या मालिकेत गंगाची भूमिका साकारणारी अदिती शर्मा सांगते, "या मालिकेत कथानकाला मिळालेल्या वळणानंतर माझा लूकदेखील पूर्णपणे बदलणार आहे. प्रेक्षकांना एका वेगळ्या रूपात मला पाहायला मिळणार आहे." 





Web Title: Ganga will get the life of Ganges in the series